Disha Patani Tiger Shorff : दिशा पटानी-टायगर श्रॉफच्या ब्रेकअपवर जॅकी श्रॉफ यांची प्रतिक्रिया

६ वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांच्यात दुरावा निर्माण झाला आहे, असे बोलले जाते.
Disha Patani Tiger Shorff
Disha Patani Tiger ShorffSaam Tv

मुंबई: 'अॅक्शन' स्टार टायगर श्रॉफ (Tiger Shroff) आणि फिटनेस क्वीन दिशा पाटनी (Disha Patani) यांच्या ब्रेकअपची बातमी बॉलीवूडमध्ये (Bollywood) व्हायरल होत आहे. टायगर आणि दिशा हे फेमस कपल आहे. हे दोघे अनेक इव्हेंटमध्ये एकत्र दिसले आहेत. पण आता हे दोघेही कपल म्हणून एकत्रित दिसणार नाहीत. ६ वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांच्यात दुरावा निर्माण झाला आहे, असे बोलले जाते.

दिशा आणि टायगरने नाते संपुष्टात आणण्याचा निर्णय का घेतला किंवा त्यांच्यात नेमके काय झाले, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. एका मुलाखतीत टायगरच्या जवळच्या एका मित्राने या दोघांच्या नात्यात दुरावा आल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. टायगर-दिशाच्या ब्रेकअपच्या बातमीवर अभिनेत्याचे वडील जॅकी श्रॉफ (Jackie Shroff) यांची आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

हे देखील पाहा -

टायगर श्रॉफच्या मुलाच्या ब्रेकअपच्या चर्चेवर प्रतिक्रिया देताना म्हणाले की, दिशा-टायगर नेहमीच मित्र होते आणि अजूनही आहेत. मी त्यांना एकत्र हँग आउट करताना पाहिले आहे. मी मुलांच्या प्रयव्हसीमध्ये जास्त पडत नाही, पण मला वाटते की ते चांगले मित्र आहेत. कामाव्यतिरिक्त ते एकमेकांसोबत वेळ घालवतात असे ते म्हणाले.

जॅकीने पुढे सांगितले की, हे त्यांचे वैयक्तिक आयुष्य आहे. त्यांनी स्वतःच याबाबत निर्णय घ्यायचा आहे. त्यांना एकत्र रहायचे आहे की नाही हे त्यांच्यावर अवलंबून आहे. ते एकमेकांशी सुसंगत आहेत की नाही? ही त्यांची प्रेमकहाणी आहे. माझी आणि माझ्या पत्नीसारखी आमची स्वतःची प्रेमकहाणी आहे. दिशासोबत आमचे चांगले समीकरण आहे. आणि मी म्हटल्याप्रमाणे, जेव्हा ते बोलतात तेव्हा ते आनंदी दिसतात.

टायगरच्या मित्राच्या म्हणण्यानुसार, ब्रेकअप झाल्यानंतरही टायगरच्या कामात कुठलाही फरक पडलेला नाही. तो आधीप्रमाणेत आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करत आहे. टायगर सध्या लंडनमध्ये एका चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे.

Disha Patani Tiger Shorff
Jalgaon: जिल्‍हा परिषद निवडणुकीपुर्वी कुणाचा पत्‍ता पडणार; आज आरक्षण सोडत

दिशा पाटनी 'एक विलेन रिटर्न्स' या चित्रपटात प्रमुख भूमिकेत असणार आहे. तर टायगर श्रॉफ 'गणपत' आणि 'बागी-4' या चित्रपटात काम करताना दिसणार आहे. दिशा आणि टायगर यांच्यात प्रेमाचं नातं आता संपुष्टात आलं असलं तरी, ते दोघे एकमेकांचे चांगले मित्र आहेत. आता दिशा आणि टायगर ब्रेकअपच्या वृत्ताबाबत आपली काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com