मला IIFA ला जाऊ द्या, जॅकलीनची कोर्टाकडे मागणी...

सुकेश चंद्रशेखर प्रकरणामुळे अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस ईडीच्या रडारवर आहे. या प्रकरणाच्या चौकशी संदर्भात तिला परदेशात जाण्यापासून रोखण्यात आलेलं आहे.
Jacqueline Fernandez
Jacqueline FernandezSaam Tv

Jacqueline Fernandez Moves Court For Travel Permission: सुकेश चंद्रशेखर प्रकरणामुळे अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस ईडीच्या रडारवर आहे. या प्रकरणाच्या चौकशी संदर्भात तिला परदेशात जाण्यापासून रोखण्यात आलेलं आहे. या प्रकरणात तिने दिल्लीच्या एका न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. अबू धाबीमध्ये पार पडणाऱ्या आयफा अवॉर्ड्समध्ये (IIFA Awards) जॅकलिनला हजेरी लावायची आहे आणि यासाठी 15 दिवस परदेश दौऱ्यासाठी परवानगी मागितली आहे.

मनी लाँड्रिंग प्रकरणात अडकलीय जॅकलिन;

तब्बल 200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसचे नाव समोर आले होते, त्यानंतर ईडीने या प्रकरणाचा तपास करत काही दिवसांपूर्वीच तिची मालमत्ता जप्त केली होती. याशिवाय जॅकलिनविरोधात लुक आऊट सर्क्युलर जारी करून तिच्या परदेश प्रवासावर बंदी घालण्यात आली होती. आता जॅकलिन फर्नांडिसला अबुधाबी, फ्रान्स आणि नेपाळच्या 15 दिवसांच्या दौऱ्यावर जायचे आहे, त्यामुळे त्यासाठी तिने न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.

Jacqueline Fernandez
अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला मोठा धक्का! 7 कोटी रुपयांची संपत्ती ईडीकडून जप्त

गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात जॅकलिन परदेशात जात असताना तिला मुंबई विमानतळावरून ताब्यात घेण्यात आले होते. जॅकलिनला ईडीच्या चौकशीनंतर घरी जाण्याची परवानगी दिली असली तरी परवानगीशिवाय ती देश सोडू शकत नाही, असे तिला सांगण्यात आलेले आहे.

काही दिवसांपूर्वीच कोटींची मालमत्ता जप्त;

काही दिवसांपूर्वी ईडीने जॅकलिन फर्नांडिसच्या घरावर छापा टाकला होता. या छाप्यात ईडीने जॅकलिनची 7.27 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली होती. या प्रकरणी जॅकलिन फर्नांडिसची ईडीने अनेकवेळा चौकशी करण्यात आली आहे. ईडीनुसार, जॅकलिनला सुकेश चंद्रशेखर यांच्याकडून खूप महागड्या भेटवस्तू मिळाल्या होत्या. ईडीनुसार, जॅकलिनने चौकशीदरम्यान याची कबुलीही दिली होती. सुकेशने एका चित्रपटासंदर्भात तिच्याशी संपर्क साधला होता, असेही जॅकलिनने चौकशीदरम्यान सांगितले आहे. जॅकलीनने दावा केला होता की, सुकेश चंद्रशेखरने आपली ओळख एका चॅनलचे मालक म्हणून करून दिली होती.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com