जॅकलीनवर 'ट्रोल'धाड; व्हायरल झालेला बोल्ड फोटो अन् खटकलेली ती एक गोष्ट!

जॅकलीन तिच्या दिलखेचक आणि हॉट अँड बोल्ड फोटोंमुळेही चर्चेत असते. परंतु काही वेळा तिला या फोटोमुळेच ट्रोलिंगला सामोरे जावे लागते. यावेळी देखील जॅकलीनने असाच एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आणि नेटकऱ्यांकडून ट्रोल झाली.
जॅकलीनवर 'ट्रोल'धाड; व्हायरल झालेला बोल्ड फोटो अन् खटकलेली ती एक गोष्ट!
Jacqueline Fernandez Bold PhotoSaam Tv

मुंबई : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) आपल्या अभिनयामुळं नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावरही (SocialMedia) ती बरीच सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती प्रत्येक अपडेट आपल्या चाहत्यांपर्यंत पोहोचवत असते. जॅकलीन तिच्या दिलखेचक आणि हॉट अँड बोल्ड फोटोंमुळेही चर्चेत असते. सोशल मीडियावर ते शेअर करते. परंतु काही वेळा तिला या फोटोमुळेच ट्रोलिंगला सामोरे जावे लागते. यावेळी देखील जॅकलीनने असाच एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आणि नेटकऱ्यांकडून ट्रोल झाली.

Jacqueline Fernandez Bold Photo
Sonu Sood : केवळ एका ट्विटवर पाठवली मदत; रियल लाईफ हिरोची आणखी एक कामगिरी

सोशल मीडियावर जॅकलीनचा एक जुना फोटो खूप व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये जॅकलीन सुंदर दिसत आहे. या फोटोमध्ये जॅकलीनने एक स्पोर्ट्स ब्रा घातली आहे. पण ही स्पोर्ट्स ब्रा एका बाजूला फाटलेली आहे. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेक नेटकरी तिला ट्रोल करू लागले आहेत. या फोटोमध्ये जॅकलीनने गुलाबी रंगाची स्पोर्ट्स ब्रा घातली आहे. सुरुवातीला जॅकलीनच्या एक्सप्रेशनमुळे लक्ष तिच्या चेहऱ्यावर राहिले, पण फोटो नीट बघितल्यावर तिच्या स्पोर्ट्स ब्रामध्ये असलेला छेद दिसून आला.

सुकेश चंद्रशेखर प्रकरणात जॅकलीनचे नाव

काही दिवसांपूर्वी जॅकलीनचं नाव सुकेश चंद्रशेखरच्या प्रकरणात समोर आलं होतं. खंडणीखोर सुकेश चंद्रशेखर याच्या २०० कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणी जॅकलीनची देखील तपास यंत्रणांकडून चौकशी करण्यात आली होती. जॅकलीनवर हा आरोप आहे की चंद्रशेखरने तिला अनेक महागड्या भेटवस्तू दिल्या आहेत. ज्यामध्ये मांजरी आणि घोडाही होता. चंद्रशेखरवर प्रतिष्ठित व्यक्तींकडे खंडणी मागितल्याचाही आरोप आहे.

Jacqueline Fernandez Bold Photo
वरुण-कियारा जोडीला मेट्रोत वडापाव खाणं पडलं महागात; जाणून घ्या प्रकरण

जॅकलीनच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, तिने अखेरीस जॉन अब्राहमसोबत अटैक पार्ट १ या चित्रपटात काम केले होते. तर लवकरच जॅकलीनचा अक्षय कुमारसोबतचा 'राम सेतू' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट या वर्षी दिवाळीमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्याशिवाय रोहित शेट्टीच्या आगामी चित्रपट 'सर्कस' मध्ये देखील काम करणार आहे. या चित्रपटात जॅकलीनसोबत रणवीर सिंह आणि पूजा हेगडे मुख्य भूमिका साकारणार आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com