अभिनेत्री नोरा फतेहीला EDचं समन्स; जॅकलिनचीही होणार पुन्हा चौकशी (Video)

नोरा आज चौकशीसाठी कार्यालायात पोहोचली आहे.
अभिनेत्री नोरा फतेहीला EDचं समन्स; जॅकलिनचीही होणार पुन्हा चौकशी (Video)
अभिनेत्री नोरा फतेहीला EDचं समन्स; जॅकलिनचीही होणार पुन्हा चौकशीSaam Tv

दिल्ली : दिल्लीच्या तिहार कारागृहात असलेल्या सुकेश चंद्र शेखरच्या (Sukesh Chandra Shekhar) 200 कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणात Money Laundering अंमलबजावणी संचालनालयाने (ED) अभिनेत्री नोरा फतेहीला Nora Fatehi समन्स बजावले आहे. याप्रकरणी नोराला समन्स बजावण्यात आले आहे. आज या प्रकरणात चौकशीत सामील होण्यास सांगितले आणि नोरा आपले जबाब नोंदवण्यासाठी ईडी कार्यालय गाठले आहे.

सुकेशवर नोरा फतेहीचीच नव्हे तर अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचीही फसवणूक केल्याचा आरोप आहे. नोरा फतेहीसोबत ईडीने अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला पुन्हा बोलावले आहे. ईडीने जॅकलीनला एमटीएनएल येथील ईडी कार्यालयात बोलावले आहे. ती उद्या म्हणजेच शुक्रवारी चौकशीत सामील होण्यासाठी बोलावले आहे. सुकेशने जॅकलिनलाही त्याच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला होता.

अनेक कलाकारांना फसवण्याचा कट;

याआधी जॅकलीनचीही ईडीने चौकशी केली होती. आधी ईडीला वाटलं होत की जॅकलीन या प्रकरणात सामील आहे, पण नंतर कळले की ती या प्रकरणाची अडकवली गेली आहे. सुकेशने लीना पॉलच्या माध्यमातून जॅकलिनची फसवणूक केली होती. जॅकलीनने ईडीला दिलेल्या पहिल्या निवेदनात सुकेशशी संबंधित महत्त्वाची माहिती शेअर केली होती.

नोराला समन्स बजावल्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, आज होणाऱ्या प्रश्नात नोरा सामील होणार की नाही हे अद्याप ठरलेले नव्हते. मात्र, नोरा आज चौकशीत सामील झाली आहे.

सुकेश चंद्र शेखर आणि त्याची कथित पत्नी अभिनेत्री लीना पॉल तिहार जेलच्या आतून 200 कोटी रुपये उकळल्याप्रकरणी तुरुंगात आहेत. असे सांगितले जात आहे की इतर लोकांप्रमाणेच सुकेशने नोरा फतेहीला त्याच्या जाळ्यात अडकवण्याचा कट रचला होता. नोरा आणि जॅकलिन व्यतिरिक्त सुकेशच्या निशाण्यावर अनेक बॉलिवूड कलाकार आणि चित्रपट निर्माते होत अशीही माहिती आहे.

Edited By-Sanika Gade

Related Stories

No stories found.