Jacqueline Fernandez | अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस अडकली; २१५ कोटींच्या खंडणी प्रकरणात ED ने केले आरोपी

अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस आता ईडीच्या रडारवर आहे. काय आहे प्रकरण जाणून घ्या!
Jacqueline Fernandez Sukesh Chandrasekhar
Jacqueline Fernandez Sukesh ChandrasekharSAAM TV

Jacqueline Fernandez Sukesh Chandrasekhar | नवी दिल्ली: बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ED) जॅकलीनला २१५ कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात आरोपी केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जॅकलीनच्या विरोधात ईडीकडून आज, बुधवारी आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrashekhar) हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे आणि खंडणी वसुली करणारा आहे हे जॅकलीनला (Jacqueline Fernandez) आधीपासूनच माहीत होते, असे ईडीचे म्हणणे आहे.

Jacqueline Fernandez Sukesh Chandrasekhar
Breaking: ईडी कडून जॅकलीन फर्नांडिसची 5 तास चौकशी

बॉलिवूडची अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसचे खंडणीखोर सुकेश चंद्रशेखर याच्यासोबतचे कनेक्शन समोर आल्यानंतर ती आणखी अडचणीत सापडली आहे. ईडीने जॅकलीनवरील कारवाईचा फास आणखी घट्ट केला आहे.

दुसरीकडे, आता ईडीने (ED) जॅकलीन फर्नांडिसला २१५ कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात आरोपी केले आहे. ईडीकडून आज या अभिनेत्रीविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळते.

Jacqueline Fernandez Sukesh Chandrasekhar
Photos: श्रीलंकन ब्युटी जॅकलीन फर्नांडिसचा IIFA मध्ये जलवा

मिळालेल्या माहितीनुसार, सुकेश चंद्रशेखरने जॅकलीन फर्नांडिसला १० कोटी रुपयांचे गिफ्ट दिले होते. ईडीने तिची ७ कोटी रुपयांहून अधिकची संपत्ती जप्त केली आहे. सुकेशने जॅकलीनच्या कुटुंबातील सदस्यांनाही महागड्या भेटवस्तू दिल्याचेही सांगितले जात आहे. कुटुंबीयांना दिलेल्या महागड्या भेटवस्तूंमध्ये कार, महागड्या वस्तू, तसेच १.३२ कोटी रुपये आणि १५ लाख रुपयांच्या निधीचाही त्यात समावेश आहे.

जॅकलीन फर्नांडिस आता या प्रकरणात पुरती अडकली आहे. सध्या ती ईडीच्या रडारवर असून, तिच्याभोवतीचा कारवाईचा फास घट्ट आवळला असून, तिला या प्रकरणात आरोपी केले आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com