जॅकलिन- सुकेश चंद्रशेखरमधील नात्याबाबत मोठा खुलासा; धक्कादायक माहिती आली समोर

२०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसची चौकशी करण्यात आली
Jacqueline Fernandez News
Jacqueline Fernandez NewsSaam Tv

मुंबई: बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) मागील काही दिवसांपासून एका वेगळ्याच प्रकरणामुळं प्रकाशझोतात आली आहे. सुकेश चंद्रशेखर सोबतच्या मनी लॅंड्रिंग प्रकरणात जॅकलिनची ईडी चौकशी सुरू आहे. अशातच तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबतही अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. नुकतीच, २०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसची चौकशी करण्यात आली. ज्यामध्ये जॅकलिनने सुकेश चंद्रशेखरसोबतच्या नात्याबद्दलचा धक्कादायक खुलासा केला आहे.

Jacqueline Fernandez News
PHOTO : ब्रिटनमध्ये कुत्र्यांसाठी चित्रपटाची स्पेशल स्क्रिनिंग; मोडला अनोखा रेकॉर्ड

मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला सुकेशसोबत लग्न करायचे होते. जॅकलिनने याबाबत अभिनेता अक्षय कुमार आणि सलमान खानला सुद्धा सांगितले होते. यानंतर या दोन्ही कलाकारांनी तिला सुकेशसोबत अलर्ट केले होते. तपास पथकातील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने हा खुलासा केला आहे, पुढे त्याने सांगितले की, याबाबत जॅकलिनला सुकेशसोबत तिच्या सहकलाकारांनी सावधगिरी बाळगण्याचा सल्लाही दिला होता. मात्र तरीही जॅकलिन सुकेशला भेटत राहिली. याशिवाय ती त्याच्याकडून अनेक महागडे गिफ्ट्स घेत राहिली.

Jacqueline Fernandez News
कंगना रणौतनं शेअर केले सेटवरचे फोटो, म्हणाली....

दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेचे प्रमुख रवींद्र यादव यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, जॅकलिनने सुकेश चंद्रशेखरच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आणि त्याच्यासोबत रिलेशन आणि व्यवहार सुरू ठेवला. ईडीच्या तपासानुसार, केवळ जॅकलिनलाच नाही तर त्याच्या कुटुंबीयांना आणि मित्रांनाही याचा आर्थिक फायदा झाला आहे.

ईडीने जॅकलिन फर्नांडिसचा व्यवस्थापक प्रशांतकडून सुपरबाइक जप्त केली आहे. जिची किंमत सुमारे आठ लाख रुपये आहे. सुकेशने ही बाइक प्रशांतला भेट म्हणून दिली आहे. सुकेश जॅकलिनला महागड्या वस्तू भेट देऊन इम्प्रेस करत होता. तो प्रचंड श्रीमंत असल्याचे जॅकलिनला भासवत होता. पण त्याने ही सगळी संपत्ती खंडणीद्वारे मिळवली होती. सुकेशने केवळ जॅकलिनलाच नाही तर अनेक अभिनेत्रींना त्याच्या जाळ्यात अडकवले आहे. याबाबतची चौकशी सध्या सुरू आहे. सूत्रांच्या माहितीनुसार बॉलिवूडच्या आणखी पाच अभिनेत्रींची नावे समोर येऊ शकतात. अलीकडेच अभिनेत्री नोरा फतेहीचं नाव समोर आले आहे आणि तिची चौकशी सुरू आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com