Jacqueline Fernandez: बॉलिवूड अभिनेत्रीची पुन्हा ईडीकडून तब्बल ८ तास चौकशी

जॅकलिन फर्नांडिस सोमवारी ईडीसमोर हजर झाली. तिची ८ तास चौकशी करण्यात आली. खंडणीखोर सुकेश चंद्रशेखर संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात जॅकलिनची चौकशी करण्यात आली. जॅकलिनने तिचा जबाब नोंदवला आहे.
Jacqueline Fernandez was questioned from ED
Jacqueline Fernandez was questioned from EDSaam Tv

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस(Jacqueline Fernandez) ईडीच्या कचाट्यात सापडली आहे. जॅकलिनला सोमवारी पुन्हा चौकशीसाठी ईडीसमोर(ED) हजर राहावे लागले. खंडणीखोर सुकेश चंद्रशेखर आणि त्याच्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ही चौकशी करण्यात येत आहे. या सर्व प्रकरणात जॅकलिनने तिचा जबाब नोंदवला आहे. ईडीने एप्रिलमध्ये मनी लाँडरिंग प्रतिबंध कायदा (पीएमएलए) अंतर्गत जॅकलिनचा ७.२७ कोटी रुपयांची मुदत ठेव निधी (FD) तात्पुरती संलग्न केली होती.

Jacqueline Fernandez was questioned from ED
महाराष्ट्राची क्रश हृताचा अंगावर काटा आणणारा 'अनन्या'चा ट्रेलर प्रदर्शित

जॅकलिन फर्नांडिसची (Jacqueline Fernandez) आधीही ईडीने (ED) खंडणीखोर सुकेश चंद्रशेखरच्या प्रकरणी दोन-तीन वेळा चौकशी केली आहे. ईडीने जॅकलिनची ८ तास चौकशी केली. पीटीआयच्या वृत्तानुसार, अधिकाऱ्यांनी सांगितले की, 'जॅकलिनला सोमवारी तिचे म्हणणे नोंदवण्यासाठी नवीन मुदत देण्यात आली होती, कारण ईडीकडून या प्रकरणाची उर्वरित चौकशी पूर्ण होणे बाकी होते'.

Jacqueline Fernandez was questioned from ED
लैंगिक अत्याचार प्रकरणात अभिनेता विजय बाबूला अटक; तीन जुलैपर्यंत होणार कसून चौकशी

जॅकलिन फर्नांडिसच्या विरोधात १५ लाख रुपये रोख तसेच ७.१२ कोटी रुपयांच्या मुदत ठेव जप्त करण्याचा तात्पुरता आदेश जारी करण्यात आला होता. तपास संस्थेने या निधीचे वर्णन 'गुन्ह्याचे उत्पन्न' असे केले होते. त्यानंतर ईडीने एका अहवालात म्हटले होते की, 'सुकेश चंद्रशेखरने खंडणीसह अन्य गुन्हेगारीतून मिळालेल्या रकमेतून जॅकलिन फर्नांडिसला ५.७१ कोटी रुपयांच्या अनेक भेटवस्तू दिल्या होत्या.'

सुकेशने दिल्या जॅकलिनला या भेटवस्तू...

जॅकलिनने गेल्या वर्षी ऑगस्ट आणि ऑक्टोबरमध्ये नोंदवलेल्या तिच्या जबाबात ईडीला सांगितले की, तिला गुच्ची, चॅनेल, तीन डिझायनर बॅग, जिम वेअरसाठी दोन गुच्ची कपडे, लूई वीटॉन शूजची एक जोडी, दोन डायमंडचे कानातले, मल्टी कलर स्टोन ब्रेसलेट आणि दोन हर्मीस ब्रेसलेट भेट म्हणून मिळाले होते. जॅकलिनला या भेटवस्तू देण्यासाठी चंद्रशेखरने आपली सहकारी पिंकी इराणीची मदत घेतली होती, असे ईडीने म्हटले होते.

अटक होईपर्यंत सुकेश जॅकलिनच्या संपर्कात होता...

जॅकलिन फर्नांडिसने पुढे सांगितले की, तिने मिनी कूपर कार परत केली आहे. दिल्ली पोलिसांनी ऑगस्टमध्ये अटक केल्यानंतर, चंद्रशेखर गेल्या वर्षी फेब्रुवारी ते ७ ऑगस्टपर्यंत जॅकलिनच्या संपर्कात असल्याचे ईडीच्या तपासात आढळून आले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com