‘जय भीम’ चित्रपटाच्या अभिनेत्यासह निर्मात्यांना नोटीस

"जय भीम" या चित्रपटामध्ये बदनामीकारक दृश्ये काढून विना अट माफी मागावी अशी कायदेशीर नोटीस वन्नियार संगमच्या तमिळनाडू राज्य अध्यक्षांनी अभिनेते सूरिया आणि चित्रपटाचे दिग्दर्शक टी. जे. ज्ञानावेल यांना दिली
‘जय भीम’ चित्रपटाच्या अभिनेत्यासह निर्मात्यांना नोटीस
‘जय भीम’ चित्रपटाच्या अभिनेत्यासह निर्मात्यांना नोटीसSaam Tv

चेन्नई : "जय भीम" या चित्रपटामध्ये बदनामीकारक दृश्ये काढून विना अट माफी मागावी अशी कायदेशीर नोटीस वन्नियार संगमच्या तमिळनाडू राज्य अध्यक्षांनी अभिनेते सूरिया आणि चित्रपटाचे दिग्दर्शक टी. जे. ज्ञानावेल यांना दिली आहे. दृश्ये बदनामी होईल, अशी डब केल्याचा आरोप त्याच्यावर लावण्यात आला आहे.

या चित्रपटाशी जे कोणी संबंधित आहेत त्यांनी वन्नियार समाज आणि त्याच्या लोकांविरोधामध्ये खोटी, द्वेषभावनेची आणि बदनामीकारक वक्तव्ये करणे थांबवावे किंवा प्रकाशित करणे थांबवावे असे देखील या नोटीस मध्ये सांगितले आहे. ५ कोटी रुपयांची नुकसान भरपाई देखील मागण्यात आली आहे. चित्रपटात दाखवण्यात आलेले प्रसंग हे खऱ्याखुऱ्या जगण्यामधील घटनांवर आधारित असले तरी राजकन्नूचा छळ करणारा पोलीस हा हेतूत: वन्नियार जातीचा दाखवण्यात आला आहे, असा देखील आरोप नोटिसमध्ये यावेळी करण्यात आला आहे.

हे देखील पहा-

आमच्या पक्षकाराने सांगितले आहे की, तुम्ही चित्रपटामध्ये खऱ्या घटनेतील खऱ्या पात्रांची खरी नावे कायम दाखवली आहेत. परंतु, उपनिरीक्षकाचे नाव तुम्ही हेतूत: बदले आहे. खऱ्या कथेत कच्च्या कैद्याच्या तुरुंगामध्ये झालेल्या मृत्यूमध्ये गुंतलेला उपनिरीक्षक हा अँन्थोनीस्वामी असून तो धर्माने ख्रिश्चन आहे, असे ही नोटीस मध्ये सांगण्यात आले आहे.

‘जय भीम’ चित्रपटाच्या अभिनेत्यासह निर्मात्यांना नोटीस
अष्टपैलू हार्दिक पांड्याला कस्टम विभागाचा दणका, मुंबई विमानतळावर कारवाई

चित्रपटावर काय आहेत आरोप?

- चित्रपट निर्मात्यांनी मुद्दाम एका दृश्यात उपनिरीक्षक हा वन्नियार आहे, हे दाखवण्याकरिता वन्नियार संगमशी संबंधित प्रतीक अग्नी कुंडम दिनदर्शिकेसह ठेवण्यात आले आहे.

- वन्नियार संगमच्या सदस्यांची बदनामी करण्याच्या हेतूने आणि संपूर्ण वन्नियार समाजाच्या प्रतिष्ठेची हानी करण्याच्या दुष्ट हेतूने हे करण्यात आले आहे.

- वन्नियार समाजाचा अपमान केल्याच्या आरोपावरून अभिनेता सूरिया आणि पट्टाली मक्काल काटची यांच्यात संघर्ष १४ नोव्हेंबर दिवशी वाढला.

- राज्यात मायिलादुथुराई जिल्ह्यात सूरिया यांच्या चित्रपटाचे प्रदर्शन पीएमकेच्या कार्यकर्त्यांनकडून बंद करण्यात आला.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com