स्वामी समर्थांची मालिका वादात; मालिकेत छत्रपतींच्या वंशजांची बदनामी केल्याचा आरोप (पहा Video)

स्वामी समर्थांच्या जीवनावर आधारित 'जय जय स्वामी समर्थ' ही मालिका वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. या मालिकेत छत्रपतींच्या वंशजांची बदनामी केल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडनं केला आहे.
स्वामी समर्थांची मालिका वादात; मालिकेत छत्रपतींच्या वंशजांची बदनामी केल्याचा आरोप (पहा Video)
स्वामी समर्थांची मालिका वादात; मालिकेत छत्रपतींच्या वंशजांची बदनामी केल्याचा आरोप (पहा Video)Saam TV

मुंबई : स्वामी समर्थांच्या जीवनावर आधारित 'जय जय स्वामी समर्थ' ही मालिका वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. या मालिकेत छत्रपतींच्या वंशजांची बदनामी केल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडनं (Sambhaji Brigade) केला आहे. या मालिकेतील एका प्रसंगात शाहू महाराजांच्या (Shahu Maharaj) घराण्यातील वंशज मालोजीराजे हे स्वामी समर्थांना भेटायला जातात. यावेळी ते स्वामी समर्थांना नजराणा पेश करतात मात्र नजराणा पाहून स्वामी समर्थांना प्रचंड राग येतो आणि ते चक्क मालोजीराजांना मारतात, असा प्रसंग त्या मालिकेत दाखवण्यात आला आहे. (Jai Jai Swami Samarth series in controversy)

पहा व्हिडीओ -

आणि या प्रसंगाममुळेच संभाजी ब्रिगेड ने चांगलीच आक्रमक घेतली हा भाग मालिकेत दाखवला तर आम्ही तो स्टुडीओ पेटवून देऊ असा इशाराच संभाजी ब्रिगेडच्या महाराष्ट्र प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी दिला आहे. तसंच छत्रपतींच्या घराण्याविषयी एवढी चीड का? असा सवालही त्यांनी केला आहे.

दरम्यान आजकाल महाराष्ट्राला झालय काय असा प्रश्न लोक विचारु लागले आहेत. कारण किरण मानेंच प्रकरण त्यानंतर अमोल कोल्हेंनी (Amol Kolhe) साकारलेली नथुराम गोडसेंची भुमिका आणि आता ही स्वामी समर्थांची मालिका त्यामुळे सर्वसामान्य नागरिक मात्र त्रस्त झाले असून राज्यातील प्रमुख अडचणींकडे दुर्लक्ष होत असल्याचं लोक म्हणत आहेत.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com