पित्याच्या पावलावर पाऊल; सुनील शेट्टीच्‍या नातीचा रोल साकारतेय दोनगावची ‘निर्भया’

पित्याच्या पावलावर पाऊल; सुनील शेट्टीच्‍या नातीचा रोल साकारतेय दोनगावची ‘निर्भया’
Sunil Shetty
Sunil Shetty

जळगाव : धरणगाव तालुक्यातील दोनगाव या छोट्याशा खेड्यातून तरुणाने सुरु केलेला जीवन प्रवास त्याला मुंबई पोलिस दलापर्यंत व पुढे आवड म्हणून अभिनय क्षेत्रापर्यंत घेऊन गेला. आता या तरुणाची मुलगी निर्भयाने पित्याच्या पावलावर पाऊल टाकत बॉलीवूडची वाट धरलीय. (jalgaon-news-Nirbhaya-little-girl-role-of-Sunil-Shetty-grandson-in-web-series)

लीलाधर पाटील या तरुणाने महाविद्यालयीन शिक्षण (Education) घेत असताना स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली, आणि फौजदार म्हणून मुंबई पोलिसमध्ये (Mumbai Police) सेवा बजावत असताना त्यांना अभिनयाची बद्दल रुची निर्माण झाली. वरिष्ठांच्या परवानगीसह त्यांनी अभिनय क्षेत्रात काम सुरू केले.

Sunil Shetty
रूबी घोडीची वटच न्‍यारी..रोज पाच लिटर दूध अन्‌ एक किलो गावरान तूप

मुलगी निभर्याही वाटेवर..

वडिलांना टीव्हीवर बघून त्यांची अकरा वर्षाची मुलगी निर्भयालाही अभिनय क्षेत्रात रस निर्माण झाला. टिक टॉक इंस्टाग्राम यासारख्या सोशल व्यासपीठांवर निर्भया लहान-मोठी अभिनयाची चुणूक दाखवत होती.

वेबसीरिजमध्ये निवड

आता तर निर्भयाची बॉलीवूड स्टार सुनील शेट्टी (Sunil Shetty), विवेक ओबेरॉय, सोनाली कुलकर्णी (Sonali Kulkarni) या दिग्गज अभिनेत्यांसोबत समीत कक्कड दिग्दर्शित ‘धारावी बँक’ या वेब सिरीजमध्ये अभिनययासाठी निवड झालेली आहे. या वेब सिरीज मध्ये निर्भया पाटील सुनील शेट्टी यांच्या नातीची भूमिका साकारणार आहे. या वेब सिरीजमध्ये निर्भयाला तमिळ भाषेत ऑडिशन द्यायचे होते.

तमिळ भाषेचा अभ्यास

एका सामान्य मराठी कुटुंबातील मुलीने यासाठी तमिळ भाषा अभ्यासायला सुरवात केली. तिची आई वैशाली पाटील यांनी तिच्याकडून मेहनत करून घेतली आणि पहिल्याच ऑडिशन टेस्टमध्ये सुनील शेट्टी यांच्या कौतुकाला पात्र ठरत तिची निवड झाली. निर्भयाचे वडील लीलाधर पाटील यांनासुद्धा सध्या सोनी वाहिनीवरील क्राइम पेट्रोल, स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठिपक्यांची रांगोळी’ मराठी मालिका सोनी सब वाहिनीवरील ‘तेरा यार हू मै’ यासह २ वेब सिरीजमध्ये पोलिस इन्स्पेक्टरची भूमिका साकारली आहे. लिलाधर पाटील यांचे आई वडील आजही दोनगाव येथे शेती करतात.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com