Video: तेजस्वी प्रकाशच्या मालिकेमधील डायलॅागवर जान्हवी कपूरने केला मजेदार व्हिडीओ

बॅालिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर अभिनयासेबतच सोशल मिडीयावर देखील मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असते.सोशल मिडीयावर तिचा चाहता वर्ग देखील मोठा आहे.
Janhvi Kapoor
Janhvi Kapoor Saam Tv

मुंबई: बॅालिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर(Janhvi Kapoor) अभिनयासेबतच सोशल मिडीयावर देखील मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असते. (Social Media)सोशल मिडीयावर तिचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. अनेकदा जान्हवी तिचे अपडेट सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर करत असते. सोशल मिडीयावर जान्हवीचे फोटो व व्हिडीओ तुफान व्हायरल होत असतात. नुकताच जान्हवीने तिचा एक रंजक व्हिडीओ शेअर केला आहे. जो सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणत व्हायरल होत आहे.

Janhvi Kapoor
Koffee With Karan 7 : सुहाना खान आणि खुशी कपूर 'कॉफी विथ करण' मध्ये करणार एन्ट्री

व्हिडिओमध्ये जान्हवी तिच्या मेकअप आर्टिस्ट प्रियंका बोरकरसोबत रील बनवताना दिसत आहे. विशेष म्हणजे जान्हवी आणि प्रियंका दोघीनी एकता कपूरच्या फेमस 'नागिन ६' मधील तेजस्वी प्रकाशच्या 'शेष नागिन' या लोकप्रिय डायलॉगवर व्हिडीओ केला आहे. व्हिडीओमध्ये जान्हवी मिठाई घेण्यासाठी कपाट उघडते तोवर प्रियंका तिला थांबवते. जान्हवीचा हा मनोरंजक व्हिडीओ चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

Janhvi Kapoor
Dunki : शाहरुख खानसोबत 'डंकी'मध्ये दिसणार तापसी पन्नू? फोटो झाले व्हायरल

इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत जान्हवी कपूरने, 'जेव्हा कोणी तुम्हाला मध्यरात्री आवडते पदार्थ खाताना पकडत तेव्हा...' असे कॅप्शनमध्ये लिहिले आहे. जान्हवीने या व्हिडीओमध्ये ग्रे कलरची पॅन्ट आणि व्हाईट क्रॉप टॉप घातलेला आहे. व्हिडीओमध्ये जान्हवी मध्यरात्री काय करते हे प्रियंकाला सांगत जान्हवी म्हणते, ज्यावेळेस मी वॉक करते, त्यावेळेस माझ लक्ष वेळेकडे नसत, माझी फिगर मेंटेन राहावी यासाठी मी मध्यरात्री पण वॉक करते.

जान्हवीच्या या मनोरंजक व्हिडीओवर २४ तासांत ५ लाखांहून अधिक व्ह्यूज आले आहेत. अनेकांनी नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर कमेंट केल्या आहेत. एकता कपूर आणि तेजस्वी प्रकाश यांनीही कमेंट केली आहे. एकता कपूरने 'स्माईल' इमोजीसह 'डेड... जर कायराला जुळी बहिण असती तर ती तुझ्यासारखीच असती'. असे कमेंटमध्ये लिहिले आहे. तर तेजस्वीने 'हार्ट' इमोजी कमेंट केल्या आहेत.

जान्हवीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, जान्हवी कपूर सध्या तिच्या आगामी चित्रपट 'गुडलक जेरी'च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. तिचा हा चित्रपट डिज्नी हॉटस्टारवर २९ जुलैला प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात दीपक डोबरियाल, मीता वशिष्ठ, नीरज सूद यांच्याही भूमिका आहेत. जान्हवीकडे नितेश तिवारीचा 'बावल' हा चित्रपट देखील आहे. या चित्रपटात वरुण धवनसोबत जान्हवी दिसणार आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com