Janhavi Latest Film
Janhavi Latest FilmInstagram

Janhavi Kapoor: जान्हवीचं चाहत्यांना मोठं गिफ्ट, ज्यू. एनटीआरसोबत साकारणार महत्वाची भूमिका

जान्हवीने तिच्या वाढदिवसानिमित्त आपल्या आगामी चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे.

Janhavi Kapoor New Film: अभिनेत्री जान्हवी कपूर लवकरच दाक्षिणात्य सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. आपल्या वाढदिवसानिमित्त जान्हवीने चित्रपटाचे पहिले पोस्टर शेअर केले आहे. जान्हवी कपूर साऊथचा सुपरस्टार ज्युनियर एनटीआरच्या आगामी सिनेमात मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसणार आहे. जान्हवी कपूरचे वडील बोनी कपूर यांनी हे वृत्त अफवा असल्याचे सांगत फेटाळून लावले होते, पण जान्हवी कपूरच्या चाहत्यांनी पोस्टर पाहून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

Janhavi Latest Film
Hera Pheri 3: मुन्नाभाईची 'हेरा फेरी 3'मध्ये एन्ट्री?, संजय दत्तनेच केला महत्वाचा खुलासा

अखेर जान्हवी कपूरने जुनियर एनटीआरच्या आगामी सिनेमात झळकणार असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. जान्हवी कपूरने काही काळापूर्वी एक पोस्टर रिलीज केले होते. जान्हवीने चाहत्यांना सांगितले होते की, ती जुनियर एनटीआरच्या आगामी सिनेमाचा भाग असून लवकरच चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार असल्याचं सांगितलं.

जान्हवी कपूरने 'धडक' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला आणि जान्हवीला प्रेक्षकांनी पहिल्याच चित्रपटात दमदार यश दिले. तेव्हापासून ती आपली अभिनय क्षमता सिद्ध करत आहे. बॉलिवूडनंतर जान्हवी कपूर आता साऊथ फिल्म इंडस्ट्रीत जाण्याच्या चर्चा नसून अखेर ठरलं आहे. अनेक बॉलिवूड अभिनेत्री दाक्षिणात्य सिनेसृष्टीत आपले पाय रोवण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यात जान्हवी कपूरही आता चर्चेत आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com