
Japani Dancer Viral Video: केदार शिंदे दिग्दर्शित ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटाची सध्या कमालीची चर्चा सुरू आहे. गेल्या महिन्यात प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात शाहीर साबळे यांचा जीवनप्रवास उलगडण्याचा प्रयत्न शाहीर साबळेंचे नातू आणि मराठी सिनेसृष्टीतील महत्वाचे दिग्दर्शक केदार शिंदे यांनी केला आहे.
सोशल मीडियासह सर्वत्र चित्रपटातील एका गाण्याची कमालीची चर्चा सुरू आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींसह परदेशी सोशल मीडिया कंटेंट क्रिएटरलाही या गाण्यावर रील बनवण्याचा मोह आवरलेला नाही. नुकतंच एका जपानी कलाकारालाही या गाण्यावर व्हिडीओ बनवण्याचा मोह आवरलेला नाही.
या जपनी कलाकाराचं नाव काकेताकू असं नाव असून त्याने ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटातील सोशल मीडियावर कमालीचा व्हायरल झालेल्या ‘बहरला हा मधुमास नवा’ या गाण्यावर रील बनवून पोस्ट केले आहे. या गाण्यावर त्याच्यासोबत सहकलाकार पिरोने देखील डान्स केला आहे.
महत्वाची गोष्ट म्हणजे, हा व्हिडीओ जपानच्या रस्त्यावर शूट केला असून चित्रपटाचे दिग्दर्शक केदार शिंदे आणि चित्रपटात प्रमुख भूमिकेत असलेली सना शिंदे हिने देखील हा व्हिडीओ त्यांच्या स्टोरीवर पोस्ट करत त्यांची हूक स्टेप आवडल्याचं सांगितलं. याचबरोबर नेटकरीदेखील या व्हिडीओवर कमेंट करत त्यांना प्रतिक्रिया देत आहेत.
या गाण्याला आतापर्यंत लाखोंच्या आसपास व्ह्यूज मिळाले आहेत. सोबतच इन्स्टाग्रामवरही या गाण्याच्या अनेक व्हिडीओज आजही चर्चेत आहेत. २८ एप्रिलला ‘महाराष्ट्र शाहीर’ हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे. अभिनेता अंकुश चौधरी शाहीरांच्या प्रमुख भूमिकेत आहे. तर सना शिंदे शाहीरांची पत्नी भानुमती साबळे यांचे पात्र साकारले आहे. अजय-अतुल यांचं संगीत सिनेमाला लाभलं आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.