'83' चित्रपटात यशपाल शर्मांच्या भुमिकेत दिसणार जतिन सरना

1983 च्या विश्वचषक विजयावर कबीर खानने '83' चित्रपट (83 Movie) केला आहे. या चित्रपटात जतिन सरना यशपाल शर्मांची व्यक्तिरेखा साकारत आहेत.
'83' चित्रपटात यशपाल शर्मांच्या भुमिकेत दिसणार जतिन सरना
'83' चित्रपटात यशपाल शर्मांच्या भुमिकेत दिसणार जतिन सरनाSaam Tv

माजी भारतीय क्रिकेटपटू यशपाल शर्मा (Yashpal Sharma) यांच्या आकस्मिक निधनाने क्रीडा जगाला हादरा बसला आहे. मंगळवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले आहे. यशपाल शर्मा क्रिकेटमधील भारताचा पहिला विश्वचषक जिंकणार्‍या संघाचे सदस्य होते आणि त्यांचा बदाम शॉट खूप प्रसिद्ध झाला होता.

1983 च्या विश्वचषक विजयावर कबीर खानने '83' चित्रपट (83 Movie) केला आहे. या चित्रपटात जतिन सरना यशपाल शर्मांची व्यक्तिरेखा साकारत आहेत. सोशल मीडियावर जतिनने यशपाल शर्मासोबत अनेक छायाचित्रे पोस्ट केली आहेत.

83 मध्ये रणवीर सिंग कपिल देवच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यावेळी कपील भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार होता. मागील वर्षी चित्रपटाच्या सर्व पात्राचे फर्स्ट लूक रिलीज झाले होते, जतीनने यशपाल शर्माच्या लूकमध्ये एक फोटो शेअर केला होता. यासह जतिनने लिहिले- या अव्वल क्रिकेटरला पडद्यावर जगणे हा सन्मान आहे.

संघातील त्यांचे स्थान आणि योग्यता सिद्ध करण्याची त्यांची आवड, यामुळे मला अधिक कष्ट करण्यास भाग पाडले आणि मी माझ्या मर्यादेला वाढवले. बदाम शॉटचा हा यशपाल यांचा आवडिचा शॅाट होता. यासह, जतिनने एक ओळ लिहिली आहे - माझी बॅट माझ्यापेक्षा जास्त बोलते.

Edited By: Pravin Dhamale

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com