
ॲटली कुमार दिग्दर्शित ‘जवान’ची सध्या जगभरात प्रचंड चर्चा सुरू आहे. शाहरुख खान, विजय सेथुपती आणि नयनताराच्या या चित्रपटामध्ये एक मराठमोळी अभिनेत्री देखील प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ती दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री गिरीजा ओक आहे. गिरीजाने चित्रपटामध्ये मुख्य पात्र साकारले असून तिच्या पात्राचे नाव इश्करा असे आहे. चित्रपटामध्ये शाहरुखच्या टीममधील एका सदस्याचं तिने पात्र साकारलंय. नुकतंच अभिनेत्रीने ‘सकाळ’ला दिलेल्या मुलाखतीत अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे.
मुलाखतीत अभिनेत्रीने शाहरुखसोबतच दाक्षिणात्य कलाकारांसोबतच्या बॉंडिंगवर आणि चित्रपटातल्या कलाकारांच्या मैत्रीवर अभिनेत्रीने भाष्य केलं आहे. अभिनेत्री मुलाखतीत म्हणाली, “ ‘जवान’ची शूटिंग रात्रीची सुरु होती. शुटिंगमधल्या फावल्या वेळेत मी आणि प्रियामणी बोलत होतो. यावेळी आमच्या दोघींचंही आपआपल्या मुलांबद्दल बोलणं सुरु होतं. मी जेव्हा शुटिंगला यायचे त्यावेळी माझा मुलगा कबीर फुटबॉल खेळून आलेला नसायचा, आणि मी सकाळी जेव्हा यायचे तेव्हा तो झोपेतून उठलेला नसायचा. आम्ही जरी एकाच घरात असलो तरी, आम्ही कधी एकमेकांना भेटत नव्हतो. या सर्व गोष्टी मी प्रियामणीला सांगायचे. आम्ही बोलत असताना, बाजुलाच शाहरुख बसलेला होता. तेवढ्यात तो मला सेम टू सेम असं बोलला. त्यावेळी त्याच्यातलं आणि माझ्यातलं बॉंडिंग दिसून आलं. त्यानंतर एकदा त्याचा मुलगाही आणि माझा मुलगा सुद्धा सेटवर आले होते.” (Bollywood Film)
दाक्षिणात्य कलाकारांची क्रेझ आणि त्यांच्या बॉंडिंगबद्दल गिरीजा म्हणते, “ ‘जवान’हा सिनेमा म्हणजे, एक बुफे सारखा चित्रपट आहे. चित्रपटामध्ये प्रेक्षकांना वेगवेगळ्या धाटणीच्या कथेसारखेच कलाकार सुद्धा पाहायला मिळत आहेत. नयनतारा आणि विजय सेथुपतीची क्रेझ दाक्षिणात्य भारतात खूप आहे. प्रेक्षकांकडून त्यांच्या अभिनयाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आम्ही केरळमध्ये शुटिंग करत होतो, त्यावेळी त्यांच्या चाहत्यांची क्रेझ मला पाहायला मिळाली. जरीही दोघांनाही प्रचंड लोकप्रियता असली तरी त्यांचे व्यक्तिमत्व खूपच सिंपल आहे. सुनिल ग्रोवरनेही चित्रपटात उत्तम अभिनय केला असून त्याची ही भूमिका फारच वेगळी आहे.” (Actress)
पुढे मुलाखतीत अभिनेत्री म्हणाली, “मी, सान्या मल्होत्रा, प्रियामणी, लहर खान, संजीता भट्टाचार्य, आणि आलिया कुरेशी आमची ‘जवान’मुळे खूप चांगली मैत्री झाली. तब्बल २ वर्ष आम्ही एकत्र शुटिंग केली आहे, त्यामुळे आमची नेहमीच भेट व्हायची. सहसा असं क्वचित घडतं की, सर्वच सेलिब्रिटींसोबत आपलं जुळतं किंवा चित्रपटातल्या सर्वच सेलिब्रिटींचं एकमेकांसोबत जुळतं हे क्वचित घडतं. इतकी बॉंडिंग मी सहसा प्रत्येक चित्रपटावेळी पाहिलेली नाही. आम्ही आता फक्त एक अभिनेत्री म्हणून नाही तर बेस्ट फ्रेंड म्हणून राहतो. अनेकदा आम्ही शुटिंग व्यतिरिक्त देखील भेटलेलो आहोत.” (Entertainment News)
शाहरुख खान आणि नयनतारासह चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत विजय सेथुपती, सान्या मल्होत्रा, प्रियामणी, अश्लेषा ठाकूर, लहर खान, रिद्धी डोगरा, संजीता भट्टाचार्य, गिरीजा ओक आणि आलिया कुरेशी हे सेलिब्रिटी आहेत. हिंदी, तमिळ, तेलुगू या तीन भाषेमध्ये ‘जवान’ ७ सप्टेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन ॲटली यांनी केलं असून निर्मिती गौरी खानने केली आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.