Jennifer Lopez Wedding : जेनिफर लोपेझ आणि बेन ऍफ्लेक अडकले विवाहबंधनात; लग्नाची अगंठी तब्बल ३७ कोटींची!

Jennifer Lopez Ben Affleck Wedding | जेनिफर आणि बेनचे नाते सुमारे 20 वर्षे जुने आहे, परंतु त्यांचे ब्रेकअप झाले होते आणि नंतर दोघांनीही दुसरे लग्न केले होते.
Jennifer Lopez Ben Affleck Wedding
Jennifer Lopez Ben Affleck WeddingInstagram/ @jlo & @elletaiwan

मुंबई: जेनिफर लोपेझ (Jennifer Lopez) आणि बेन ऍफ्लेक (Ben Affleck) यांनी लग्नगाठ बांधली आहे. दोघांनी लास वेगासमध्ये लग्न (Wedding) केले. या जोडप्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल (Viral Photos) होत आहेत. जेनफिर आणि बेन अखेर एकत्र आल्याने चाहत्यांना खूप आनंद झाला आहे. जेनिफर आणि बेनचे नाते सुमारे 20 वर्षे जुने आहे, परंतु त्यांचे ब्रेकअप झाले होते आणि नंतर दोघांनीही दुसरे लग्न केले होते. पण गेल्या वर्षी दोघे पुन्हा एकत्र आले आणि अखेर आता पुन्हा लग्न केले आहे. (Jennifer Lopez Ben Affleck Wedding News)

हे देखील पाहा -

दोघांचे अफेअर 2000 सालापासून चर्चेत

जेनिफर लोपेझ आणि बेन ऍफ्लेक यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. छायाचित्रांमध्ये जेनिफरने पांढऱ्या रंगाचा गाऊन घातला आहे, तर बेन काळ्या रंगाच्या सूटमध्ये दिसत आहे. जेनिफर लोपेझ आणि बेन अफ्लेक या दोघांचे अफेअर 2000 सालापासून चर्चेत होते.

2002 मध्ये दोघांनी एंगेजमेंट केली होती. पण त्याच वर्षी दोघांचे ब्रेकअपही झाले होते. यानंतर दोघांनी वेगवेगळ्या जोडीदारांसोबत लग्न केले होते. त्यांना मुलं देखील आहेत. मात्र, काही काळानंतर ते पुन्हा एकत्र आले होते आणि त्यांनी लग्न केले. मात्र, काही कारणात्सव हे दोघे वेगळे झाले होते. गेल्या वर्षी दोघे पुन्हा एकत्र आले आणि एप्रिलमध्ये एंगेजमेंट झाली, त्यानंतर दोघांनी आता लग्न केले. जेनिफर आणि बेन यांनी एका निवेदन जारी करत त्यांच्या लग्नाची घोषणा केली. त्यात जेनिफरने लिहिले की, "प्रेम सुंदर आहे, प्रेम दयाळू आहे. म्हणूनच प्रेम देखील सहनशील आहे. 20 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर आता एकत्र आलो आहोत."

Jennifer Lopez Ben Affleck Wedding
Tamasha Live : अप्सराचा 'गरमा गरम' लूक; सोनालीच्या हॉट फोटोजने वाढवला इंटरनेटचा पारा

जेनिफर लोपेझची अंगठी 37 कोटींची!

मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की जेनिफर लोपेझने तिचे नाव बदलून जेनिफर ऍफ्लेक केले आहे. एप्रिलमध्ये जेनिफर लोपेझ आणि बेन ऍफ्लेक यांची एंगेजमेंट झाली होती आणि त्यावेळी जेनिफर लोपेझची अंगठी चर्चेत आली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेनिफरच्या अंगठीची किंमत सुमारे 5 मिलियन डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनात सुमारे 37 कोटी रुपये होती. त्याचवेळी, काही रिपोर्ट्समध्ये असे देखील बोलले जात आहे की, या अंगठीची किंमत 10 मिलियन पेक्षा जास्त म्हणजे सुमारे 76 कोटी रुपये आहे.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com