Jiah Khan Case: तब्बल १० वर्षांनी जिया खान प्रकरणाचा निकाल लागणार

Jiah Khan Case Result: जिया खान प्रकरणावर उद्या म्हणजे २८ एप्रिलला सकाळी १०:३० वाजता अंतिम सुनावणी होणार आहे.
Jiah Khan - Suraj Pancholi Case
Jiah Khan - Suraj Pancholi CaseSaam TV

Jiah Khan - Suraj Pancholi Case: बॉलीवूड अभिनेत्री जिया खानने ३ जून, २०१३ ला स्वतःच्या राहत्या घरी आत्महत्या करत जीवन संपवले होते. आत्महत्येनंतर तिच्या घरातून सहा पानांचे सुसाईड नोट सापडले होते. जे जिया खानने लिहिले असल्याचे सांगण्यात आले होते. त्या नोट नुसार जियाचा बॉयफ्रेंड सुरज पांचोलीने तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले, असा आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणात २० एप्रिलला सीबीआयचे विशेष जज एएस सैयद यांनी दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून अंतिम युक्तिवाद शेवत्या सुनावणीला राखून ठेवला आहे. आता जिया खान प्रकरणावर उद्या म्हणजे २८ एप्रिलला सकाळी १०:३० वाजता सीबीआयच्या विशेष न्यायालयात अंतिम सुनावणी होणार आहे.

Jiah Khan - Suraj Pancholi Case
Bhumika Chawla Replaced In Movies: भूमिका चावलाला बाजीराव मस्तानीसह 3 मोठ्या चित्रपटांची होती ऑफर, पण...

दिवंगत अभिनेत्री जिया खानची आई राबिया खानने सूज पांचोलीवर अनेक आरोप केले होते. त्यानंतर सुरज पांचोलीला १० जून २०१३ला अटक करण्यात आली होती. सुरज पांचोली २ आठवड्यांहुन अधिक दिवस पोलीस कोठडीत होता.

त्यानंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली. त्यानंतर जुलै २०१४ला हे प्रकरण ५ वर्षासाठी सीबीआयकडे होते. जियाच्या आईने देखील सांगितले के कि हत्या नसून आत्महत्या आहे. मुंबई उच्च न्यालयाने या प्रकरणाचा पुन्हा नव्याने तपास करणारी याचिका फेटाळून लावली होती.

जिया खानच्या आईने सीबीआय कोर्टात निवेदन दिले होते, तेव्हा तिने सांगितले होते की सूरज जियावर शारिरीक आणि शाब्दिक अत्याचार करत होता. पोलीस आणि सीबीआय या दोघांनीही हे सिद्ध करण्यासाठी कोणतेही पुरावे गोळा केलेले नाहीत, असेही तिने म्हटले आहे.

निशब्द या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री जिया खानच्या आत्महत्येला आता १० वर्षे पूर्ण होतील. उद्या, २८ एप्रिल रोजी सकाळी १०:३० वाजता विशेष सीबीआय न्यायालय १० वर्षांनंतर या प्रकरणाचा निकाल देणार आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com