Godavari: 'गोदावरी'ची हॅट्रिक; प्रवाह पिक्चर पुरस्कारात मारली बाजी

गोदावरी चित्रपट प्रदर्शनाआधीच चर्चेत आहे. चित्रपटाने २०२१ मध्ये भारतातील सर्वोत्तम १० चित्रपटांमध्ये आपले स्थान निर्माण केले होते.
Godavari Movie
Godavari MovieSaam Tv

मुंबई: जिओ स्टुडिओज प्रस्तुत गोदावरी चित्रपटाची जबरदस्त चर्चा सुरु आहे. या चित्रपटाने प्रदर्शनाआधीच बऱ्याच पुरस्कारांवर आपले नाव कोरले आहे. 'गोदावरी' चित्रपटाने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त केले आहेत. ११ नोव्हेंबर रोजी चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. नुकताच पार पडलेला 'प्रवाह पिक्चर पुरस्कार सोहळा'मध्ये या चित्रपटाने एक दोन नव्हे तर तब्बल सात पुरस्कार प्राप्त केले आहे. विशेष म्हणजे, चित्रपट अद्याप प्रदर्शित झाला नसूनही या चित्रपटाने अनेक पुरस्कार प्राप्त केले आहेत.

Godavari Movie
Urfi Javed Video : उर्फी जावेदच्या 'या' नवीन लूकमुळे चालन झालं कठीण, दोन्ही पाय बांधून बनवला असा व्हिडिओ

गोदावरी चित्रपट प्रदर्शनाआधीच चर्चेत आहे. चित्रपटाने २०२१ मध्ये भारतातील सर्वोत्तम १० चित्रपटांमध्ये आपले स्थान निर्माण केले होते. सोबतच 'न्युयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हल २०२२' मध्ये ओपनिंग फिल्म म्हणून निवड केली होती. 'कान्स' मध्येही 'गोदावरी'ने आपली जादू दाखवली होती. 'इफ्फी २०२१' मध्ये जितेंद्र जोशीने सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा 'सिल्वर पीकॉक पुरस्कार' जिंकला होता तर निखील महाजन यांना 'सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा विशेष ज्युरी पुरस्कार' मिळवला होता. 'पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२२' मध्ये 'सर्वोत्कृष्ट दिग्दर्शका'चा निखील महाजनला तर 'सर्वोत्कृष्ट सिनेमेटोग्राफीचा' शमीन कुलकर्णी यांना पुरस्कार प्राप्त झाला आहे. विशेष ज्युरीतील 'सर्वोत्कृष्ट संगीत पुरस्कार' एवी प्रफुलचंद्राला मिळाला होता.

नुकताच पार पडलेला प्रवाह पिक्चरचा 'प्रवाह पिक्चर पुरस्कार' मध्येही 'गोदावरी'ने बाजी मारली आहे. चित्रपटाला एकुण ७ पुरस्कार प्राप्त झाले आहेत. जितेंद्र जोशीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तो बोलतो, 'चित्रपट ११ नोव्हेंबरला प्रदर्शित होत आहे. तब्बल ७ पुरस्कार पटकावत 'गोदावरी' चित्रपटाने बाजी मारली आहे. सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन' यातील विजेत्यांचे नावे पुढीलप्रमाणे.

सर्वोत्कृष्ट अभिनेता- जितेंद्र जोशी

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- निखिल महाजन

सर्वोत्कृष्ट कथा- निखिल महाजन, प्राजक्ता देशमुख

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता (पुरुष)- प्रियदर्शन जाधव

सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक- राहुल देशपांडे

सर्वोत्कृष्ट साऊंड डिझाईन- बेलॉन फोन्सेका

सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत- ए. व्ही. प्रफुल्लचंद्र

Edit By- Chetan Bodke

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com