Jr Ntr Fans Burn Firecrackers In Theater: ज्युनियर एनटीआर बर्थडेला चाहत्यांनी थिएटर पेटवलं; व्हिडिओ व्हायरल

Jr Ntr's Simhadri Re-released: Jr NTR चा 2003 मध्ये प्रदर्शित झालेला तेलगू चित्रपट 'सिम्हाद्री' तेलगू राज्यांमध्ये अभिनेत्याच्या वाढदिवसानिमित्त पुन्हा प्रदर्शित करण्यात आला.
Jr Ntr Fans Burn Firecrackers In Theater
Jr Ntr Fans Burn Firecrackers In TheaterSaam TV

Jr NTR Fans On His Birthday: दाक्षिणात्य अभिनेता ज्युनियर एनटीआर त्याच्या अभिनयासोबतच त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत असतो. 'RRR' चित्रपटाने भारतासह जगभरातील प्रेक्षकांची मने जिंकणारा सुपरस्टार ज्युनियर एनटीआर लवकरच जान्हवी कपूरसोबत 'देवरा' चित्रपटातून लोकांचे मनोरंजन करण्यासाठी येत आहे.

Jr NTR चा 2003 मध्ये प्रदर्शित झालेला तेलगू चित्रपट 'सिम्हाद्री' तेलगू राज्यांमध्ये अभिनेत्याच्या वाढदिवसानिमित्त पुन्हा प्रदर्शित करण्यात आला. त्यानंतर चित्रपटगृहांमध्ये एक मोठी दुर्घटना घडली.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'सिम्हाद्री' रिलीज झाल्यानंतरही चाहत्यांनी चित्रपट गृहामध्ये तुफान गर्दी केली आणि ज्युनियर एनटीआरच्या चित्रपटाचा आनंद लुटला होता. उत्साही चाहत्यांनी थिएटरमध्ये फटाके फोडण्यास सुरुवात केली. (Latest Entertainment News)

Jr Ntr Fans Burn Firecrackers In Theater
Anupam Kher injured : अनुपम खेर यांच्यासोबत घडलं अघटित; चित्रपटाच्या शूटिंगवेळी जखमी

फटाके फोडल्यानंतर काही वेळातच सिनेमा हॉलमध्ये आग लागली आणि या दुर्घटनेत चित्रपटगृहाच्या नुकसान झाले. काही सीटचे जाळून गेल्या. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ही घटना विजयवाडा येथील अप्सरा चित्रपगृहात घडली असल्याचे च्यारलं व्हिडिओमध्ये सांगण्यात येत आहे.

ज्युनियर एनटीआर 'देवरा' चित्रपटात दिसणार आहे. अभिनेत्याच्या वाढदिवसानिमित्त या चित्रपटाशी संबंधित त्याचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला. विशेष म्हणजे या चित्रपटात अभिनेत्यासोबत जान्हवी कपूरही दिसणार आहे. या चित्रपटाद्वारे अभिनेत्री तेलुगू चित्रपटांमध्ये पदार्पण करणार आहे. वृत्तांवर विश्वास ठेवला तर ज्युनियर एनटीआर या चित्रपटात दुहेरी भूमिकेत दिसणार आहे.

ज्युनिअर एनटीआरचा ३० वा चित्रपट आहे. त्यामुळे या चित्रपटाला आधी एनटीआरचे ३० एनटीआर म्हणत होते. अखेर चित्रपटाचे नाव 'देवरा' असे जाहीर करण्यात आले. हा चित्रपट पुढच्या वर्षी एप्रिलमध्ये प्रदर्शित होणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले. या पोस्टरमध्ये ज्युनिअर एनटीआरच्या हातात एक शस्त्र आहे त्याच्या आजूबाजूला अनेक मृतदेह दिसत आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com