Cast of 'War 2': सुपरस्टार ज्युनियर एटीआर-हृतिक रोशन यांच्यात 'वॉर' रंगणार; टायगर श्रॉफ मात्र पत्ता कट

Jr NTR joins the cast of 'War 2': ज्युनियर एनटीआरला यशराजने वॉर 2 ऑफर केला होता.
War 2 Cast
War 2 CastInstagram

Jr NTR and Hrithik Roshan Together In War 2: हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ यांच्या 'वॉर' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली होती. कालच यशराज फिल्म्सकडून या चित्रपटाच्या सिक्वेलविषयी माहिती देण्यात आली. तसेच या चित्रपटाचे दिग्दर्शन अयान मुखर्जी करणार असल्याचे देखील यशराजने सांगितले.

अयान मुखर्जीने ब्रह्मास्त्र चित्रपटाचे काम 'वॉर 2'मुळे थांबवले आहे. अयान मुखर्जीने अधिकृत निवेदन प्रसिद्ध करून लोकांना याची माहिती दिली होती.

वॉर 2 या चित्रपटात अयान मुखर्जीची एन्ट्री झाल्यानंतर आता ज्युनियर एनटीआरही यात सामील होणार असल्याचे बोलले जात आहे. ज्युनियर एनटीआरला यशराजने वॉर 2 ऑफर केला होता. यशराजची ही ऑफर ज्युनिअर एनटीआरने स्वीकारली आहे.

War 2 Cast
Adipurush Film: चित्रपटातील वाद आणखी शिगेला?, नेटकऱ्यांनी पोस्टरमधील चुका दाखवत केले पुन्हा ट्रोल

हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआर चित्रपटात एकत्र काम करण्याची ही पहिलीच वेळ आहे. वॉर 2 या चित्रपटात ज्युनियर एनटीआर आणि हृतिक रोशन एकमेकांशी दोन हात करताना दिसणार आहेत.

ट्रेड एक्सपर्ट तरण आदर्श यांनी ट्विटद्वारे सांगितले आहे की, 'वॉर 2 चित्रपटात ज्युनियर एनटीआरची अधिकृत एंट्री झाली आहे. यशराज बॅनरने हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआरला एकत्र आणण्याचा निर्णय घेतला आहे. हे दोघे पहिल्यांदाच चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन अयान मुखर्जी करणार आहे.

वॉर 2 हा चित्रपट यशराज बॅनरच्या स्पाय युनिव्हर्सचा मेगा अॅक्शन चित्रपट आहे. वॉर चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर भरगोस यश मिळाले होता, त्यामुळे आदित्य चोप्रा वॉर 2 साठी जोमाने काम करायला सुरुवात केली आहे. आदित्य चोप्राने वॉर २ या चित्रपटाची तयारी सुरू केली आहे. टायगर 3 च्या शेवटी, तो वॉर 2 च्या कथेबद्दल एक हिंट देईल जेणेकरून प्रेक्षक वॉर 2 ची वाट पाहतील.

ज्युनियर एनटीआरची चित्रपटामध्ये एन्ट्री झाल्याने टायगर श्रॉफची एक्सिट झाली आहे. यामुळे टायगरचे फॅन्स निराश झाले असतील.

वॉर चित्रपटातील गाणी आणि अॅक्शसह टायगर-हृतिकच्या डान्सची तेव्हा जोरदार चर्चा होती. हृतिकचे लूकने सगळ्यांचे लक्ष वेधले होते. तर हृतिक आणि टायगरच्या जोडीने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com