Jubin Nautiyal Tweet : गायक जुबिन नौटियालवर अटकेची टांगती तलवार? सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी आवळला सूर

जुबिनने सोशल मीडियावर एक ट्विट करून आपले मत व्यक्त केले आहे.
Jubin Nautiyal
Jubin NautiyalSaam Tv

मुंबई : आपल्या सुरेल आवाजाने लाखो लोकांच्या हृदयावर राज्य करणारा जुबिन नौटियाल(Jubin Nautiyal) गेल्या काही दिवसांपासून ट्रोलच्या निशाण्यावर आहे. जुबिन भारतातील वाँटेडसोबत आगामी कॉन्सर्ट करणार असल्याच्या बातम्यांमुळे सोशल मीडियावर त्याच्या अटकेची मागणी होत आहे. या सर्व प्रकारादरम्यान आता गायक जुबिन नौटियालने मौन सोडले आहे. जुबिनने सोशल मीडियावर एक ट्विट करून आपले मत व्यक्त केले आहे. या ट्विटमध्ये जुबिनने केवळ त्याचे स्पष्टीकरणच दिले नाही तर चाहत्यांना अफवांवर विश्वास न ठेवण्याची विनंतीही केली आहे. जुबिनचे हे ट्विट सोशल मीडियावर(Social Media) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Jubin Nautiyal
Brahmastra : बॉयकॉट ट्रेंडमध्येही ब्रम्हास्त्र चालला! दुसऱ्याच्या दिवशी १०० कोटी क्लबमध्ये समावेश

ट्रोलिंगनंतर जुबिन नौटियालने त्याच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर एक ट्विट केले आहे जे मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जुबिनने ट्विट करत लिहिले, 'सर्व मित्र आणि ट्विटर परिवाराला नमस्कार. पुढील महिन्यात मी प्रवास आणि शूटिंगमध्ये व्यस्त आहे. कोणत्याही प्रकारच्या अफवांमुळे खचून जाऊ नका. माझे माझ्या चाहत्यांवर आणि देशावर खूप प्रेम आहे'.

Jubin Nautiyal
Brahmastra : बॉयकॉट ट्रेंडमध्येही ब्रम्हास्त्र चालला! दुसऱ्याच्या दिवशी १०० कोटी क्लबमध्ये समावेश

या संपूर्ण गदारोळानंतर जुबिन नौटियालचा अमेरिका दौरा रद्द झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. आता जुबिनच्या मॅनेजरने सोशल मीडियावर टूर रद्द झाल्याच्या बातम्यांची पुष्टि केली आहे. जुबिन नौटियालचे मॅनेजर रॉकी खन्नाने इन्स्टाग्रामवर जुबिन नौटियालचे पोस्टर शेअर केली असून त्यावर CANCEL असे लिहिले आहे. हे पोस्टर शेअर करताना मॅनेजरने लिहिले की, 'मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो की जुबिन नौटियालचा लाइव्ह यूएस टूर खूप पूर्वी रद्द झाली होती. कृपया कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नका किंवा पसरवू नका. जय हिंद.'

जुबिन नौटियाल एका पोस्टरमुळे सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. या पोस्टरमध्ये जुबिनच्या अमेरिका दौऱ्याची माहिती देण्यात आली होती. हे पोस्टर व्हायरल झाल्यानंतर, कॉन्सर्टच्या आयोजकामुळे जुबिनला ट्रोल केले जात आहे. सोशल मीडियावर या आयोजकाला भारतातील वाँटेड गुन्हेगार म्हटले गेले आहे, ज्याचे नाव जयसिंग आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com