...असाच वेडा राहा; मृण्मयी देशपांडेच्या 'चॉकलेट बॉय'ला बर्थ डेच्या हटके शुभेच्छा

मृण्मयी देशपांडे सोशल मिडीयावरून आपल्या लाडक्या मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्या देणारी पोस्ट शेअर केली आहे. तिने त्या दोघांचा खूप जुना फोटो पोस्ट करून त्याखाली कॅप्शनमध्ये तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
...असाच वेडा राहा; मृण्मयी देशपांडेच्या 'चॉकलेट बॉय'ला बर्थ डेच्या हटके शुभेच्छा
Mrunmayee Deshpande InstagramSaam Tv

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील चुलबुली अभिनेत्री मृण्मयी देशपांडे सोशल मिडीयावर नेहमीच काही ना काही पोस्ट करत असते. तिचा सोशल मीडियावर बराच मोठा चाहता वर्ग आहे. मृण्मयी अनेकदा तिची बहिणं गौतमीसोबत मजेदार व्हिडीओ सोशल मिडीयावर शेअर करत असते. हे व्हिडीओ वेगाने सोशल मिडीयावर व्हायरल होतं असतात. याचबरोबर मृण्मयी तिचे फोटोशूट आणि फिटनेसचे व्हिडियो देखील शेअर करत असते. आता देखील तिने आपल्या लाडक्या मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्या देणारी पोस्ट शेअर केली आहे.

Mrunmayee Deshpande Instagram
'आईला मला व्हॉलीबॉल खेळाडू बनवायचं होतं, पण...'; शिल्पा शेट्टीचा मोठा खुलासा

आज मराठी चित्रपट सृष्टीतील चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जाणारा अभिनेता सिद्धार्थ चांदेकरचा वाढदिवस आहे. त्याला शुभेच्छा देणारी एक पोस्ट मृण्मयी देशपांडेने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. तिने त्या दोघांचा खूप जुना फोटो पोस्ट करून त्याखाली कॅप्शन मध्ये लिहिले आहे की , 'आपण असे दिसत असल्यापासून ते आज पर्यंत... आपण आहोत आणि कायम असणार आहोत...माझ्या लाडक्या मित्रा...वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्या...असाच वेडा राहा...मोठा नको होऊस...आणि माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे'.

Mrunmayee Deshpande Instagram
Brahmastra : मौनी रॉयचा फर्स्ट लूक पाहून तुमच्याही पायाखालची वाळू सरकेल...

मृण्मयीने शेअर केलेल्या फोटोमध्ये सिद्धार्थ तिच्याकडे गोंधळात पडलेला चेहऱ्याने बघत आहे. तर मृण्मयी त्याला काही तरी समजावतं आहे. या त्यांच्या फोटोवर चाह्त्यांसोबत कलाकारांनी देखील कॉमेंट केली आहे. आदिनाथ कोठारेने कॉमेंट केली की, आणि तो आजही तुझ्याकडे असाच बघतो'. तर तिच्या चाहत्यांनी लिहिले की, 'मनाच्या कोपऱ्यात असलेल्या सुखद साठवणी, आयुष्यात शेवटपर्यंत सोबत राहण्याच्या आठवणी, तुमची मैत्री कायम अशीच राहो'.

मृण्मयीच्या कामाबद्दल बोलयचे तर, तीने अलीकडेच 'चंद्रमुखी'या चित्रपटात दमयंती दौलत देशमानेही महत्वपूर्ण भूमिका साकारली होती. तर सिद्धार्थ चांदेकर याने 'झिम्मा' या चित्रपटात अखेरचे काम केले आहे.

Edited By - Shruti Kadam

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com