K-Pop Star Haesoo Died At 29
K-Pop Star Haesoo Died At 29Saam TV

K-Pop Singer Death: के-पॉप स्टार गायिकेची वयाच्या २९ व्य वर्षी निधन

Haesoo Died At 29: 13 मे रोजी गायिका तिच्या घरी मृतावस्थेत आढळली होती.

K-Pop Singer Haesoo Died: के-पॉप स्टार हायसू वयाच्या 29 व्या वर्षी निधन झाले आहे. ती तिच्या हॉटेलच्या खोलीत मृतावस्थेत आढळली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पोलिसांना एक सुसाइड नोट मिळाली आहे. हायसूच्या मृत्यूने त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. वयाच्या अवघ्या 29 व्या वर्षी हायसूच्या हे पाऊल उचलल्याने चाहते हळहळ व्यक्त करत आहेत.

आयोजकांनी जेओला बुक-डोच्या वांजू गन मधील ग्वांगजुम्यॉन पीपल्स डे कार्यक्रमातील तिच्या सादरीकरणाविषयी विचारण्यासाठी कॉल केला. 20 मे रोजी हा कार्यक्रम होणार आहे. तेव्हा कळलं की सिंगर आता या जगात नाही. (Latest Entertainment News)

K-Pop Star Haesoo Died At 29
Actress Celebrate Baby Shower: दृश्यम फेम अभिनेत्री आई होणार! कपलचा क्युट व्हिडिओ व्हायरल

हायसूचा जन्म 1993 मध्ये झाला. तिने 2019 मध्ये माय लाइफ, मी ती या सोलो अल्बमने आपल्या करिअरची सुरुवात केली. गायो स्टेज, हँगआउट विथ यू आणि द ट्रॉट शोमध्ये परफॉर्म करून ती लोकप्रिय झाली.

पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, 13 मे रोजी गायिका तिच्या घरी मृतावस्थेत आढळली होती. हायसूच्या आकस्मिक निधनाने सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. हायसू तिच्या मृत्यूच्या एक दिवस आधीपर्यंत सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांच्या संपर्कात होती. हायसू अगदी नॉर्मल होती, तिच्या चाहत्यांना ती असे काही करेल याची जाणीव देखील झाली नाही.

19 एप्रिल रोजी के-पॉप गायक मूनबिनचा मृतदेह गंगनम येथील त्याच्या घरी सापडला. वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी त्याने आत्महत्येसारखे पाऊल उचलले होते. पोलिसांनी मूनबिनच्या मृत्यूचा तपास सुरू केला असला तरी प्राथमिक तपासात ही आत्महत्या असल्याचे समजले.

एका महिन्यात ही के - पॉप स्टारच्या आत्महत्येची दुसरी घटना आहे. त्यामुळे त्यांच्या मृत्यूवर संशय व्यक्त होत आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com