Kailash Kher Attacked : गायक कैलाश खेरवर लाईव्ह शोमध्ये हल्ला; क्षुल्लक कारणावरुन प्रेक्षकाची सटकली

Bottle Thrown at Kailash Kher During Concert: कर्नाटकमध्ये एका कॉन्सर्टदरम्यान कैलाश खेर यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे.
Kailash Kher
Kailash KherSaam Tv

Hampi News: बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक कैलाश खेर नेहमीच आपल्या दमदार आवाजासाठी ओळखला जातो. त्याच्या आवाजाची जादू देशभरातील प्रेक्षकांच्या मनात नेहमी आहे. आपल्या आवाजामुळे आणि वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत राहणारे कैलाश खेर आज वेगळ्याच कारणाने प्रसिद्धीझोतात आले आहेत. कर्नाटकमध्ये एका कॉन्सर्टदरम्यान कैलाश खेर यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे.

Kailash Kher
Nawazuddin Siddiqui: नवाजच्या पत्नीची सासूविरोधात पोलीस स्थानकात धाव, गंभीर आरोप करत दिली तक्रार...

मिळालेल्या माहितीनुसार, गायक कैलाश खेर यांच्यावर कर्नाटकात एका कॉन्सर्टदरम्यान हल्ला करण्यात आला आहे. कॉन्सर्टदरम्यान गायकावर बाटली फेकण्यात आली आहे. बाटली फेकणाऱ्या व्यक्तीवर तात्काळ उपस्थित पोलिसांनी कारवाई केली आहे. परंतू अद्याप कैलाश खेर यांच्या प्रकृतीबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

Kailash Kher
Shah Rukh Khan Viral Video: झुमे जो पठान... शाहरुखचं चाहत्यांना सरप्राईज, अचानक बाल्कनीमध्ये आला अन्...

कर्नाटकातील हम्पी शहरात कैलाश खेर यांच्या कार्यक्रमात प्रचंड गर्दी जमली होती, त्या दरम्यान एका व्यक्तीने कैलाश यांच्याकडे बाटली फिरकवली. कैलाश खेर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हम्पीतील या कार्यक्रमाची माहिती शेअर केली होती. रविवारी कैलाश खेर यांनी ट्विट करत सांगितले होते की, 'भारतातील प्राचीन शहर, कालखंड, मंदिरं हम्पीच्या रूपात समाविष्ट केले जात आहे. कैलास खेरचा शिवनाद आज हंपी महोत्सवात गुंजणार आहे.'

Kailash Kher
Hemangi Kavi: हेमांगीला सुद्धा शाहरुखच्या 'पठान'ची भुरळ, पोस्ट करत म्हणते, 'तो कसा दिसतो, त्याचा धर्म काय?'

हंपीमध्ये सुरू असलेल्या कॉन्सर्टमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर गायक कैलाश खेर यांच्या प्रकृतीबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. कैलाश आणि त्याचा बँड कैलाश या मैफिलीत सहभागी झाले होते. मात्र, या हल्ल्यामागच्या कारणाबाबत बोलताना, कॉन्सर्टदरम्यान एका व्यक्तीने गायकाकडे कन्नड गाणे गाण्याची वारंवार मागणी केल्याचे कळते. मात्र त्याची विनंती कैलासपर्यंत न पोहोचल्याने त्याने त्याच्यावर बाटलीने हल्ला केला. पोलिसांच्या चौकशीतही हल्लेखोराने असेच वक्तव्य केले आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com