व्हायरल मीम फेम अभिनेत्रीचे वयाच्या १६ व्या वर्षी निधन

अभिनेत्रीच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
Kailia Posey News, Kailia Posey deathNews, kailia posey passed away
Kailia Posey News, Kailia Posey deathNews, kailia posey passed awaySaam Tv

‘टॉडलर्स अँड टियाराज’ या मालिकेत काम करणारी बाल कलाकार कॅलिया पोसीचे (Kailia Posey) हिचे वयाच्या १६ व्या वर्षी निधन झाले आहे. तिच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.कॅलियाच्या मृत्यूमुळे तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सोशल मीडियावर (Social Media) पोस्ट शेअर करत कॅलियाच्या आईने तिच्या निधनाची बातमी दिली आहे. (Kailia Posey passed away)

पोसीने अमेरिकेतील टीव्ही रिअॅलिटी मालिका 'टॉडलर्स अँड टियारस'मध्ये काम केले आहे. या मालिकेत ती आपल्या आईसोबत दिसली होती. तिच्या आईने फेसबुकवर मुलीचा फोटो शेअर करत एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

'माझ्याकडे शब्द नाहीत, माझी सुंदर मुलगी आम्हला सोडून गेली आहे. कृपया आम्हाला प्रायव्हसी द्या... कारण कॅलियाच्या निधनाने आम्हाला धक्का बसला आहे. असे कॅप्शन मार्सी यांनी या फोटोला दिले आहे. कॅलिया पोसी वयाच्या 5 व्या वर्षी एका व्हायरल GIF मुळे चर्चेत आली होती. सोशल मीडियावर कॅलियाचे चाहते दुःख व्यक्त करत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यामातून अनेकजण तिला श्रद्धांजली वाहत आहेत.

Edited By - Shivani Tichkule

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com