योगी सरकारला पुन्हा सत्तेत आणण्यासाठी भाजपला मतदान करा, कंगनाचे आवाहन

लक्षात ठेवा विजयाचा हा विक्रम मोडता कामा नये, एकही मत चुकता कामा नये
kangana
kanganaSaam Tv

मुंबई - उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) उद्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. त्यासाठी सत्ताधारी पक्षासह विरोधकांनी ताकद लावली आहे. त्याचवेळी आता बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावतने (Kangana Ranaut) यूपीच्या लोकांना भाजपला मतदान करण्याचे आवाहन केले आहे. तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर व्हिडिओ शेअर करत कंगना म्हणाली की, योगी सरकारला (Yogi Government) पुन्हा सत्तेत आणण्यासाठी भाजपला मतदान करा असे आवाहन कंगनाने मतदारांना केले आहे. (Kangana appeals to Vote for BJP)

कंगना या व्हिडिओमध्ये म्हणते की, "आपल्या सर्वांना माहित आहे की उत्तर प्रदेशमध्ये निवडणुका सुरू आहेत आणि या निवडणुकीत कुरुक्षेत्रात आमचे एकमेव हत्यार मतदान आहे, लक्षात ठेवाआपल्याला आपल्या आवडत्या योगी सरकारला परत आणायचे आहे, त्यामुळे भरपूर मतदान करा. मतदानाला जातांना तीन ते चार जणांना सोबत घ्या. लक्षात ठेवा विजयाचा हा विक्रम मोडता कामा नये, एकही मत चुकता कामा नये, जय श्री राम."

kangana
Akluj: शिवाजी महाराजांची भव्य दिव्य 50 फूट उंच प्रतिकृती

हा व्हिडिओ शेअर करताना कंगनाने कॅप्शनमध्ये लिहिले की, लक्षात ठेवा विजयाचा हा विक्रम मोडता कामा नये, एकही मत चुकता कामा नये, जय श्री राम,कंगनाच्या या व्हिडिओला अनेकजण पसंती देत ​​आहेत. आतापर्यंत 2 लाखांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाईक केले आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com