Kangana Ranaut: दीड वर्षांनंतर कंगनाची ट्विटरवर वापसी; पहिल्या ट्वीटमध्ये म्हटलं...

Kangana Ranaut Back On Twitter: कंगना रणौत पुन्हा एकदा दीड वर्षानंतर ट्विटरवर परतली आहे.
Kangana Ranaut New Movie
Kangana Ranaut New Movie Saam tv

Kangana Ranaut Twitter: बॉलिवूड क्वीन कंगना रणौत सध्या 'इमर्जन्सी' चित्रपटामुळे बरेच चर्चेत आहे. पण आता ती एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. तिचे बंद झालेले ट्वीटर अकाऊंट आता पुन्हा एकदा सुरु झाले आहे. कंगना रणौत पुन्हा एकदा दीड वर्षानंतर ट्विटरवर परतली आहे. खुद्द अभिनेत्रीने तिच्या अकाऊंटवरून ट्विट करत चाहत्यांना ही माहिती दिली आहे.

Kangana Ranaut New Movie
Pathaan Leaked in HD: या ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सवर लीक झाला शाहरुख खानचा बहुप्रतिक्षित 'पठान'

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतचे ट्विटर अकाऊंट गेल्या वर्षी सस्पेंड करण्यात आले होते. पण आता मायक्रो-ब्लॉगिंग साइटवर परत आली आहे. कंगनाने अलीकडेच तिची सोशल मीडिया टीम हँडल करत असलेल्या ट्विटर अकाउंटवरून ट्विट करत ही माहिती दिली आहे.

कंगनाने तिच्या टीमच्या ट्विटर हँडलवरुन ट्विट करत सांगितले की, 'सर्वांना नमस्कार, ट्वीटरवर परत आल्याने खूप छान वाटत आहे.' कंगना रणौतचे चाहते तिच्या ट्वीटला रिट्वीट करीत तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत आहे.

कंगना रणौत ट्वीट मुळे बरीच चर्चेत आली आहे. टेस्ला प्रमुख एलॉन मस्क यांनी ट्विटरचा ताबा घेतल्यानंतर, कंगना राणौतने आशा व्यक्त केली की ती लवकरच ट्विटरवर परत येईल आणि अखेर तसे झाले. इतकंच नाही तर कंगनाने एलॉन मस्क ट्वीटरच्या प्रमुख पदी आल्यानंतर त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला होता. कंगना गेल्या एक वर्षापासून तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलद्वारे लोकांशी जोडली गेली होती. कारण 9 मे 2021 रोजी या अभिनेत्रीचे ट्विटर अकाऊंट बऱ्याच वादानंतर ब्लॉक करण्यात आले होते.

Kangana Ranaut New Movie
Oscar Shortlists 2023: भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, 'या' दोन चित्रपटांना ऑस्कर नॉमिनेशन...

कंगनाच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर नुकतेच तिच्या 'इमर्जन्सी' चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. चित्रपटाच्या नावावरून अंदाज आला असेल की हा चित्रपट देशातील सर्वात मोठ्या राजकीय घटनेवर आधारित आहे. 'इमर्जन्सी'मध्ये कंगना रणौतने देशाच्या माजी स्व. पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटाचे कंगनाने दिग्दर्शनही केले आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com