Kangana Ranaut: बाबो...! कधी दगडांच्या मागे कपडे बदलणाऱ्या कंगनाकडे आज आहे ६५ लाखांची व्हॅनिटी

Kangana Ranaut's vanity van: दगडामागे कपडे बदलणाऱ्या कंगनाकडे आज स्वतःची व्हॅनिटी व्हॅन आहे.
Kangana Ranaut Vanity Van
Kangana Ranaut Vanity VanSaam Tv

Kangana Ranaut Had Customise Vanity Van: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत तिच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. पर्णातू कंगना तिच्या बेधडक आणि बेताल वक्तव्यांमुळे देखील बातम्यांचा विषय होते. कंगना अशा अभिनेत्रींपैकी एक आहे ज्यांनी प्रेक्षकांना बॉलिवूडची दुसरी बाजू देखील दाखवली आहे. कंगनाने तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या दिवसात दगडामागे जाऊन कपडे बदलले आहेत. शूटिंगदरम्यान तिला अशा गोष्टी देखील पहिल्या आहेत. परंतु कंगनाच्या यशाने अनेकांची तोंडे बंद झाली आहेत.

एकेकाळी दगडामागे कपडे बदलणाऱ्या कंगनाकडे आज स्वतःची व्हॅनिटी व्हॅन आहे. जी तिने कस्टमाईजही केली आहे. केतन रावलने कंगनाच्या व्हॅनिटी व्हॅनची माहिती दिली आहे. केतन रावलने अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींसाठी व्हॅनिटी व्हॅन्स डिझाइन केल्या आहेत.

Kangana Ranaut Vanity Van
Bhumi Pednekar: भूमी पेडणेकरची नवी भूमिका: भारतातील गरिबी संपवण्यासाठी घेणार पुढाकार

कंगनाच्या व्हॅनिटी व्हॅनबद्दल सांगताना केतन रावल म्हणाले, 'कंगनाला तिच्या व्हॅनिटी व्हॅनसाठी खूप पारंपरिक लूक हवा होता. तिला व्हॅनिटी व्हॅनमध्ये घरासारखा अनुभव हवा होता. म्हणूनच तिला तिची व्हॅनिटी व्हॅन तिच्या घराच्या लूकप्रमाणे कस्टमाईज करायची होती. तिच्या व्हॅनिटी वॅनमधील सोफ्यावर नक्षीकाम आहे. तर खुर्च्याही लाकडापासून बनवल्या गेल्याचे त्यांनी सांगितले. कंगनाची व्हॅनिटी व्हॅन बनविण्यासाठी 65 लाख रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.

कंगना व्यतिरिक्त केतनने बॉलिवूडमधील इतर सेलिब्रिटी व्हॅनिटी व्हॅनबद्दलही सांगितले, अभिनेत्री पूनम ढिल्लनमुळेच व्हॅनिटी व्हॅनची संकल्पना आमच्यापर्यंत आली. इतकंच नाही तर बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानच्या व्हॅनिटी व्हॅनबद्दलही त्याने सांगितलं की, 'शाहरुखची व्हॅन इतकी मोठी आहे की ती सगळीकडे नेता येत नाही. त्यामुळे शाहरुख खान माझ्याकडून नेहमीच व्हॅन घेतो.

केतनकडे संपूर्ण इंडस्ट्रीमधील एकूण ६५ व्हॅनिटी व्हॅन आहेत. एवढेच नाही तर अंबानीपासून ते मुंबई पोलिसांपर्यंत सगळेच त्यांची व्हॅनिटी व्हॅन वापरतात. आम्ही तुम्हाला सांगतो की साऊथ इंडस्ट्री देखील केतनची व्हॅनिटी व्हॅन वापरते, ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com