अरेच्चा! ...म्हणून कंगनाचं लग्न होईना!; स्वत:च केला मोठा खुलासा

Kangana Ranaut : नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कंगनाने लग्नाबाबत मोठा खुलासा केला आहे.
अरेच्चा! ...म्हणून कंगनाचं लग्न होईना!; स्वत:च केला मोठा खुलासा
Kangana RanautSaam Tv

मुंबई : बॉलिवूड क्वीन कंगना रणौत(Kangana Ranaut) नेहमी आपल्या वकत्याव्यामुळे चर्चेत असते. मग ते कोणत्यातरी कलाकारासोबतचे वाद असो, किंवा मग राजकारण्यातल्या एका विषयावर भाष्य करणं असो. कंगना नेहमी सडेतोड वक्तव्य करत असते. पण जेव्हा तिच्या वैयक्तिक (Kangana Relationship) रिलेशनशिप आयुष्याचा विचार केला जातो, तेव्हा कंगना मौन बाळगणे पसंत करते. आतापर्यंत कंगना रणौतने तिच्या रिलेशनशिप स्टेटसबद्दल कुठलंही भाष्य केलं नाही. मात्र, नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कंगनाने लग्नाबाबत (Kangana Ranaut Wedding) मोठा खुलासा केला आहे. काही अफवांमुळे माझं लग्न होत नसल्याचं कंगनाने म्हटलं आहे.

Kangana Ranaut
मला IIFA ला जाऊ द्या, जॅकलीनची कोर्टाकडे मागणी...

अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान कंगना गंमतीत म्हणाली की, तिचं लग्न होत नाहीये कारण, अनेकांकडून ती भांडखोर असल्याची अफवा पसरवलं जात आहे. लोकांना असं वाटतं की कंगना खूप रूड आहे, त्यामुळे ती नेहमीच सर्वांशीच भांडत असावी. आता अफवा अशा प्रकारे पसरल्या की, लोकांनी माझ्याबद्दल त्यांचे मत बनवले आहे आणि आता हेच कारण आहे की मला एकही परफेक्ट मॅच मिळत नाही.

कंगनाचा 'धाकड' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. हा ट्रेलर लोकांना खूप आवडला आहे. (Dhakad) कंगना रानौत आणि अर्जुन रामपाल (Arjun Rampal) यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट २० मे रोजी चित्रपटगृहात झळकण्यासाठी पूर्णपणे सज्ज झाला आहे. या चित्रपटात अभिनेत्री ऍक्शन करतानाही दिसणार आहे. अशा स्थितीत सिद्धार्थ काननच्या एका मुलाखतीत कंगनाला विचारण्यात आले की, ती खऱ्या आयुष्यात तिच्या चित्रपटातील व्यक्तिरेखे इतकी मजबूत का आहे? हा प्रश्न ऐकून हसत हसत कंगना म्हणाली, 'तसं नाही आहे. खऱ्या आयुष्यात मी कुणाला मारणार? माझं लग्न होत नाही आहे कारण लोकं माझ्याविषयी अफवा पसरवत आहेत.'

अर्जुन रामपालने केलं कौतुक

दरम्यान, या संपूर्ण मुलाखतीमध्ये 'धाकड' सिनेमातील अभिनेता अर्जुन रामपाल देखील होता. त्याने कंगनाचा चांगुलपणा तर सांगितलाच, पण अशा अफवा पसरवू नका असेही मजेशीरपणे सांगितले. तो म्हणाला की, 'कंगनाबद्दल मी एवढेच सांगेन की ती एक अप्रतिम अभिनेत्री आहे. ती जे काही करते, ते तिच्या भूमिकेसाठी करते, पण खऱ्या आयुष्यात ती तशी नाही. कंगना खऱ्या आयुष्यात खूप गोड, प्रेमळ आहे.'

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.