
Distributor Demanded Money From Kangana Ranaut: बॉलिवूडमधील बेधडक अभिनेत्री कंगना रनौतने आता निर्मात्यांने चित्रपटाचे नुकसान भरून काढण्यासाठी पैशांची मागणी केली आहे. यामुळे कंगनाला टीकाचे सामना करावा लागत आहे. अलिकडच्या काळात कंगनाचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर अयशस्वी ठरले, तर 'थलायवी' या चित्रपटाचे कंगनाने जोरदार प्रमोशन केले होते. आता या चित्रपटाच्या वितरकाने नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
अभिनेत्री कंगनाने तिच्या चित्रपटाचे कौतुक न केलेल्या बॉलिवूड स्टार्सवर सडकून टीका केली. कंगनाने या चित्रपटाला दाद न देणाऱ्या सेलिब्रिटींना बॉलिवूड माफिया म्हणत लिहिले, 'मी बॉलीवूड माफियांची वाट पाहत आहे,
'आमचे राजकीय आणि वैचारिक मतभेद बाजूला ठेवत, मला चांगल्या कलेचे कौतुक करणे कठीण वाटत नाही. कदाचित ते देखील त्यांच्या क्षुल्लक मानवी भावनांच्या वर व्यक्त करतील आणि एखाद्याच्या कलेचा विजय होऊ देतील. थलायवी.'
कंगना रनौतचा चित्रपट 'थलाईवी' सप्टेंबर 2021 मध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री आणि तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्या बायोपिक आहे. मात्र, या चित्रपटातील कंगनाच्या अभिनयाचे कौतुक झाले.
पण चित्रपटाच्या कलेक्शन विचार केला तर हा चित्रपट त्याच्या निर्मिती खर्च देखील वसूल करू शकलेला नाही. आता अशी चर्चा आहे की या चित्रपटाच्या जगभरातील वितरकाने चित्रपटाच्या निर्मात्यांकडे 6 कोटी रुपये परत करण्याची मागणी केली आहे.
चित्रपट प्रदर्शित होऊन दीड वर्षांहून अधिक काळ लोटला असल्याने कंपनी त्याविरोधात न्यायालयात धाव घेऊ शकते, असे बोलले जात आहे. वृत्तानुसार, कंगनाच्या 'धाकड' चित्रपटाचे वितरक आणि निर्मातेही त्यांचे नुकसान भरून काढू शकलेले नाहीत.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.