Kangana Ranaut Tweet: 'स्त्रीचा अपमान करणाऱ्याला देव...'; कंगनाने काढली खुन्नस, साधला उद्धव ठाकरेंवर निशाणा

कंगना रनौतने जुना वाद उकरून काढला आहे.
Kangana Ranaut On Uddhav Thackrey
Kangana Ranaut On Uddhav Thackrey Saam TV

Kangana Ranaut Tweeted Against Uddhav Thackeray: अभिनेत्री आणि दिग्दर्शिका कंगना रनौत नेहमीच तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. आता ही कंगनाने महाराष्ट्राच्या राजकारणात उडी घेतली आहे. ट्विट करत कंगनाने महाराष्ट्रातील राजकारणावर तिचे मत व्यक्त केले आहे.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कंगनाची अधिकृत कार्यालय पाडण्यात आले होते. त्यानंतर कंगनाने उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. आता शिंदे आणि ठाकरे गटाच्या निकालावर निवडणूक आयोगाने निकाल दिल्यानंतर कंगनाने पुन्हा एकदा ट्विट करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

Kangana Ranaut On Uddhav Thackrey
Raj Kapoor Bungalow SOLD: आर के स्टुडिओनंतर आता राज कपूरचा बंगला ही विकला, वाचा सविस्तर...

ट्विट करत कंगनाने लिहिले आहे की, 'देवांचा राजा इंद्राला सुद्धा दुष्कृत्ये केल्याने स्वर्गातून खाली यावे लागते, तो फक्त एक नेता आहे, जेव्हा त्याने माझे घर अन्यायाने तोडले तेव्हा मला समजले, तो लवकरच पडेल, देव चांगल्या कर्मांनी उठू शकतात परंतु जो स्त्रीचा अपमान करणारा वाईट माणूस नाही… तो आता कधीच उठणार नाही.'

या ट्विटमध्ये कंगनाने उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केला आहे. वाईट कृत्य केल्यावर देवाला देखील शिक्षा होते. उद्धव ठाकरे यांना कंगनाने सामान्य माणूस म्हटले आहे. तुच्या या ट्विटवर अनेक नेटकरी प्रतिक्रिया देत आहेत. तसेच उद्धव ठाकरेंविषयी बोलताना भाषा वापर असे सूचित करत आहेत.

सध्या महाराष्ट्रातील राजकारणात उलथापालथ सुरू आहे. निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह निवडणूक आयोगाने शिंदी गटाला दिले आहे.

एकनाथ शिंदे आणि ४० आमदारांनी बंड करत शिवसेना सोडली होती. तसेच भाजपासोबत जात नवीन सरकार स्थापन केले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com