Kangana Ranaut Post: 'ही नव्या युगाची सुरुवात... ' महिला आरक्षणावर कंगना रनौतने व्यक्त केला आनंद

Kangana Ranaut On Women's Reservation: अभिनेत्री कंगना रनौतने महिला आरक्षणाच्या निर्णयाचे कौतुक केले आहे.
Kangana Ranaut
Kangana Ranaut Saam TV

Women's Reservation Bill:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने सोमवारी संध्याकाळी झालेल्या बैठकीत महिला आरक्षण विधेयकाला मंजुरी दिली. आता हे विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये मांडण्याचा मार्ग मोकळा झाला. या विधेयकात महिलांसाठी विधानमंडळात जागा आरक्षित ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे.

भारतीय राजकारणात या मुद्द्यावरून बरेच वाद झाले. आता या विधेयकाला कॅबिनेटकडून मंजुरी मिळाल्यानंतर तमाम भारतीय स्त्रियांना खूप आनंद झाला आहे. अभिनेत्री कंगना रनौतने या निर्णयाचे कौतुक केले आणि याला एका नवीन युगाची सुरुवात म्हटले.

Kangana Ranaut
Kartik Aaryan At Lalbaugcha Raja: कार्तिक आर्यन लालबागच्या राजाच्या दर्शनाला गेला अन् भक्तांच्या गराड्यात अडकला

कंगनाने सोमवारी रात्री एक्सवर (ट्विटर) एक फोटो पोस्ट केला आहे. लिहिले आहे की, 'आपण सर्वजण एका नव्या युगाची सुरुवात पाहत आहात. आता आपली वेळ आई आहे. ही वेळ मुलींची आहे (यापुढे स्त्री भ्रूणहत्या नाही) ही तरुणींची वेळ आहे (सुरक्षिततेसाठी पुरुषांना चिकटून राहू नका), ही वेळ आहे मध्यमवयीन स्त्रियांची, ही वेळ वृद्ध महिलांची आहे (जगाला तुमच्या ज्ञानाची आणि अनुभवाचीही गरज आहे, तुमची वेळ आली आहे) नवीन जगात तुमचे स्वागत आहे. आमच्या स्वप्नांच्या भारत #WomenReservationBill मध्ये आपले स्वागत आहे.'

या विधेयकाचा देशावर कसा परिणाम होईल हे सांगताना कंगना म्हणाली, “ही मुलीची वेळ आहे. आता स्त्री भ्रूणहत्या होणार नाही. तरुणींचा हा काळ आहे. सुरक्षेसाठी पुरुषांवर अवलंबून राहू नका, मध्यमवयीन स्त्रियांचा हा काळ आहे, वृद्ध स्त्रियांचा हा काळ आहे. या नवीन युगात कंगनाने सर्व स्त्रियांचे स्वागत केलं आहे.'

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर कंगना लवकरच राघव लॉरेन्ससोबत 'चंद्रमुखी 2' मध्ये दिसणार आहे. तसेच कंगना रनौत 'तेजस'मध्ये देखील दिसणार आहे, जो 20 ऑक्टोबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

'इमर्जन्सी'मध्येही कंगना मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शनही तिनेच केले आहे. अनुपम खेर, मिलिंद सोमण आणि सतीश कौशिक हे कलाकारही या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. 24 नोव्हेंबरला सिनेमागृहात चित्रपट रिलीज होणार आहे. (Latest Entertainment News)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com