कृषी कायदे मागे घेताचं कंगना संतापली

रस्त्यावर बसणारे लोक कायदे बनवणार असतील तर...
कृषी कायदे मागे घेताचं कंगना संतापली
कृषी कायदे मागे घेताचं कंगना संतापलीSaam Tv

मुंबई -केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात  गेल्या वर्षभरापासून शेतकरी ठाण मांडून बसले होते. गेल्या अनेक महिन्यांपासून या कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू होते. आज हे तिन्ही कृषी कायदे  अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी रद्द करण्याचा निर्णय जाहिर केला.

हे देखील पहा -

मोदींच्या या घोषणेचे शेतकरी आंदोलनाच्या समर्थकांनी स्वागत केले मात्र एक व्यक्ती मोदींच्या या निर्णयावर चांगलीच भडकली आहे. बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतने (Kangana Ranaut) सोशल मीडियावरुन एक पोस्ट देखील शेयर करत आपल्याला कृषी कायदा रद्द केल्याने वाईट वाटल्याचे  सांगितले आहे. या निर्णयाला दु:खद, लज्जास्पद आणि अयोग्य असल्याचे म्हंटले आहे. मोदींनी आज सकाळी तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर  कंगनाने एक पोस्ट शेअर केली. यात तिने मोदींच्या निर्णयाविरोधात आपली नाराजी व्यक्त केली.

दु:खद, लज्जास्पद आणि  अयोग्य... संसदेत बसणाऱ्या लोकांनी निवडून दिलेल्या सरकार ऐवजी जर रस्त्यावर बसणारे लोक हे कायदे बनवणार असतील तर हा देश सुद्धा 'जिहादी' देश आणि या जिहादी देशाचे कौतूक करायला हवं. ज्यांना हे हवंय, त्यांचे अभिनंदन, अशी पोस्ट कंगनाने शेअर केली आहे.कंगना मोदींच्या निर्णयाने भडकली असली तरी बॉलिवूडच्या अनेक अन्य कलाकारांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com