Kabzaa Official Trailer: बॉक्स ऑफिसवर 'कब्जा' करण्यासाठी दाक्षिणात्य चित्रपट सज्ज; अमिताभ बच्चननी शेअर चित्रपटाचा ट्रेलर

कांतारानंतर आता कब्जा हा चित्रपट संपूर्ण देशभर प्रदर्शनासाठी सज्ज आहे.
Kabzaa Official Trailer Out
Kabzaa Official Trailer Out Instagram @kabzaamovieofficial

Kannad Movies Kabzaa Trailer Out: दाक्षिणात्य चित्रपटांनी गेल्या काही वर्षांपासून रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले आहे. या चित्रपटांनी बॉलिवूड चित्रपटनाची देखील क्रेज कमी केली आहे. बाहुबली या चित्रपटानंतर दाक्षिणात्य चित्रपटनाविषयी वाढलेले आकर्षण अद्याप कायम आहे.

तामिळ, तेलगूसह कन्नड चित्रपटांचा देखील गाजावाजा आहे. कन्नड चित्रपट कांताराला जगभरातील प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. कांतारानंतर आता कब्जा हा चित्रपट संपूर्ण देशभर प्रदर्शनासाठी सज्ज आहे.

Kabzaa Official Trailer Out
Hera Pheri 3: मुन्नाभाईची 'हेरा फेरी 3'मध्ये एन्ट्री?, संजय दत्तनेच केला महत्वाचा खुलासा

कब्जा चित्रपटाचा ऑफिशियल हिंदी ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाचा ट्रेलर खूपच दमदार आहे. जबरदस्त अॅक्शन, संवाद या ट्रेलरमध्ये आहेत. किच्चा सुदीप वगळता इतर कलाकार हिंदी चित्रपट पाहण्याऱ्या प्रेक्षकांसाठी नवीन आहेत. परंतु असे असले तर चित्रपटाचा ट्रेलर लोकांना खूप आवडला आहे. एका दिवसात 27 लाखाहून अधिक वेळा हा ट्रेलर पाहिला गेला आहे.

ट्रेलरमधील पाहिलंच वाक्य आहे, "मी एका भारतीयाला दुसर्‍या भारतीयाला ठार मारण्यासाठी आणत आहे." या चित्रपटामध्ये एक गुंड कसा मोठा होतो हे दाखविण्यात आले आहे. या चित्रपटामध्ये नेते, खलनायक, गुंड सर्वच पात्र तुम्हाला दिसणार आहेत. त्यात रक्तपात आणि इमोशन देखील आहे. अमिताभ बच्चन यांनीही त्यांच्या सोशल मीडियावरून या चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला आहे.

चित्रपट केजीएफ आणि केजीएफ 2 सारखा असल्याचे तुम्हाला नक्की जाणवेल. केजीएफने प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढवल्या आहेत त्यामुळे या चित्रपटावर त्या अपेक्षांचा दबाव नक्की असेल. अभिनेता उपेंद्र या चित्रपटाच्या मुख्य भूमिकेत आहे आणि तो दमदार अॅक्शन करताना दिसत आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com