Kantara Movie: थिएटरमध्ये धुमाकूळ घालणारा 'कांतारा' OTT वर येणार का? आली मोठी अपडेट

कांतारा चित्रपटाच्या निर्मात्यांनी चित्रपटाची ओटीटी रिलीज डेट पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
Kantara Movie OTT Released
Kantara Movie OTT ReleasedSaam Tv

Kantara Movie OTT Released: ऋषभ शेट्टीच्या कांतारा चित्रपटाला अभूतपूर्व यश मिळाले आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन एक महिना उलटला आहे, तरीही या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर कमाई सुरूच आहे. कन्नडमधील या चित्रपटाला हिंदीत डब करण्यात आले आहे. या हिंदी डब चित्रपटामुळे बॉलिवूडचे नुकतेच प्रदर्शित झालेले चित्रपट फोन भूत, मिली आणि डबल XL यांच्या कमाईवर त्याचा परिणाम झाला आहे. कांतारा चित्रपटाने दक्षिण भारतात कमाई केल्यानंतर संपूर्ण देशात आपली छाप सोडली आहे. त्यामुळे कांतारा चित्रपटाच्या निर्मात्यांनी चित्रपटाची ओटीटी रिलीज डेट पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

Kantara Movie OTT Released
Priyanaka Chopra: 'संध्याकाळी 7 वाजल्यानंतर मला भिती वाटते', असे प्रियांका चोप्रा का म्हणाली?

कांताराचे स्ट्रीमिंग अधिकार अॅमेझॉन प्राईम व्हिडिओने विकत घेतले आहेत. कांतारा चित्रपट 4 नोव्हेंबर रोजी ओटीटीवर प्रदर्शित होणार अशी अफवा पसरल्याने चाहत्यांनी गोंधळ घातला. या ब्लॉकबस्टर चित्रपटाचा प्रीमियर 18 नोव्हेंबर रोजी होणार असल्याची बातमी सुद्धा पसरली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार निर्मात्यांनी कांताराच्या ओटीटी रिलीजची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. चित्रपट बॉक्सवर उल्लेखनीय कामगिरी करत आहे. (OTT)

ऋषभ शेट्टी दिग्दर्शित, कन्नड फीचर फिल्म कांतारा हिंदीमध्ये डब केल्यानंतर 26 दिवसांमध्येच चित्रपटाने 67 कोटींहून अधिक कलेक्शन केले आहे. अक्षय कुमार (राम सेतू), अजय देवगण (थँक गॉड), कतरिना कैफ (फोन भूत), आयुष्मान खुराना (डॉक्टर जी) असे अनेक प्रमुख कलाकार असलेल्या चित्रपटांना कांताराने मागे टाकले आहे. (Bollywood)

'आयएमडीबी 'द्वारे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या भारतातील सध्याच्या टॉप 250 चित्रपटांच्या यादीत कांतारा चित्रपट पहिल्या क्रमांकावर कांताराने 1 क्रमांकावर आहे.

'कंतारा' चित्रपट कर्नाटकच्या किनापट्टीवरील होणारे जमिनीचे राजकारण आणि माणूस विरुद्ध निसर्ग या मुद्द्यावर आधारित आहे. चित्रपटात ऋषभ एक कंबाला चॅम्पियन म्हणून काम केले आहे. 30 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट ऋषभ यांनी लिहिला आणि दिग्दर्शित केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com