
Kapil Sharma-Bharati Singh Ramp Walk With Kids: कॉमेडियन कपिल शर्मा आणि भारती सिंग नेहमीच चर्चेत असतात. कधी त्यांच्या कामामुळे तर कधी त्यांच्या मुलांमुळे. भारती आणि कपिल त्यांच्या मुलांसोबत पुन्हा एकत्र दिसले आहेत. काल 14 मे रोजी रात्री दोघेही मुलगी आणि मुलासोबत एका कार्यक्रमात हजार होते. या कार्यक्रमात दोघांनी मुलांसह रॅम्प वॉक केला. मुलांसह रॅम्पवर चालतानाची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली असून नेटकरी त्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.
भारती सिंह तिचा मुलगा गोला आणि कपिल शर्मा मुलगी अनायरासोबत मंचावर दिसले. दोघांनी रॅम्प वॉक केला. पहिला कपिल त्याच्या 3 वर्षाच्या मुलीचा हात धरून मंचावर आला. दोघेही ब्लॅक आऊटफिटमध्ये होते. बाप-लेकीची जोडी खूप सुंदर दिसत होती. (Latest Entertainment News)
कपिल प्रेक्षकांना हात दाखवून नमस्कार करत होता आणि मुलीलाही तसे करण्यास सांगत होता. इतकेच नाही तर कॉमेडियनने मुलीला फ्लाइंग किस देण्यास सांगितले आणि तिनेही अतिशय गोंडस पद्धतीने केले. जे पाहून सगळेच तिचे कौतुक करू लागले.
व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी अनेक कमेंट केल्या आहेत. एकाने लिहिले - ती अब्दू रोजिकच्या धाकट्या बहिणीसारखी दिसते. तर दुसऱ्याने लिहिले - ती अगदी गिन्नीसारखी दिसते. 'ही आई गिन्नीची हुबेहुब कॉपी आहे' असेही काहींनी म्हटले आहे. तसेच काहींनी अनायराला तिच्या आजीसारखीच दिसत असल्याचे म्हटले आहे. मुलगी खूप निरागस आणि गोंडस दिसत आहे असल्याच्या कमेंट अनेकांनी केल्या आहेत.
याच कार्यक्रमात भारती सिंह आणि गोला देखील होते. मात्र, कृष्णा अभिषेक गोलाला घेऊन रॅम्पवॉक करताना दिसला. कृष्णाने एका हातात गोलाला उचलले आहे तर दुसऱ्या हातात भरतीचा हात धरून तो रॅम्पवॉक करत आहे. हे तिघे येताच खूप शिट्ट्या वाजू लागतात.
यानंतर गोला त्याच्या आईकडे जाताच प्रेक्षकांना हॅलो करतो. इतक्या गर्दीमुळे तो गोंधळून गेल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहत्यांनी त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आणि लाल हार्ट इमोजीसह कमेंट केल्या आहेत.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.