
Kapil Sharma Spoke About His Co-Star: 'द कपिल शर्मा शो' हा एक लोकप्रिय कॉमेडी शो आहे. अनेक सेलिब्रिटी या शोला हजेरी लावतात. कपिल शर्मासोबतच या शोमधील इतर कलाकारांवरही प्रेक्षक भरभरून प्रेम करतात. कृष्णा अभिषेक, चंदन प्रभाकर आणि अली असगर विनोदवीर सध्या या शोमध्ये दिसत नाहीयेत. खुद्द कपिल शर्माने यामागचे कारण सांगितले आहे.
अभिनेता आणि कॉमेडियन कपिल शर्माने कृष्णा अभिषेक, चंदन प्रभाकर आणि अली असगर यांनी लोकप्रिय शो 'द कपिल शर्मा शो' का सोडला याबाबत खुलासा केला आहे. कृष्णाने पगाराच्या वादामुळे शो सोडण्याचा निर्णय घेतला, तर चंदनला बाकीच्या प्रोजेक्टवर लक्ष केंद्रित करण्यासाठी ब्रेक हवा असल्याने कार्यक्रमाला रामराम केला. तर अलीने कपिल शर्मा शोमधून बाहेर जाण्यामागचे कारण “क्रिएटिव्ह मतभेद” असल्याचे कपिलने सांगितले.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कपिलने चंदन प्रभाकर, कृष्णा अभिषेक आणि अली असगर यांसारख्या त्याच्या जुन्या सहकलाकारांनी “वेगवेगळ्या कारणांसाठी” शो सोडल्याचे उघड केले आहे. कपिलने सांगितले की, 'द कपिल शर्मा शो'चा प्रोड्युसर (निर्माता) बनणार आहे. कपिलने पुढे सांगितले की, 'कोणाला शोमध्ये ठेवायचे आणि कोणाला ठेवायचे नाही याचा निर्णय चॅनेलवर आहे आणि त्याचा नाही.'
दरम्यान, चंदन प्रभाकरने यापूर्वी सांगितले होते की, तो गेल्या ५ वर्षांपासून हा शो करत आहे. त्यामुळे त्याने कपिल शर्मा शोमधून ब्रेक घेतला आहे. चंदनला इतर दुसऱ्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करायचे होते. त्याला वेबसीरीजमध्ये का कार्याचे आहे. याविषयी सांगताना चंदनने माध्यमांना सांगितले की, “अनेक वेळा एखादी व्यक्ती प्रोजेक्ट करायचा की नाही या विचारात असते. हा शो करण्याबाबत मला खात्री नव्हती, म्हणून पहिल्या भागानंतर मी माझा निर्णय घेतला. लोकांनी काहीही गृहीत धरू नये. सर्व ठीक आहे.”
'द कपिल शर्मा शो'मध्ये सपनाची भूमिका साकारणाऱ्या कृष्णा अभिषेकने नुकतेच सांगितले की तो कपिल शर्मासोबत “लवकरच” काम करणार आहे. कृष्णाने पगाराच्या वादामुळे द कपिल शर्मा शो सोडण्याचा निर्णय घेतला होता.
कपिल शर्मा आणि कृष्णा यांच्यात बिनसलं असल्याचे म्हटले जात होते. मात्र कृष्णाने या सर्व अफवांना पूर्णविराम लावला आहे. “मला कपिल आवडतो, मला शो आवडतो. त्याच्याकडे खूप मोठे टॅलेंट आहे, तो मित्र आणि भावासारखा आहे, त्याने गेली काही वर्ष माझी काळजी घेतली आहे," कृष्णाने एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.