कपिल शर्माचा थक्क करणारा प्रवास आला समोर, Zwigato चा ट्रेलर रिलीज

चित्रपटात कपिल शर्मा फूड डिलिव्हरी बॉयच्या भूमिकेत दिसणार आहे.
kapil sharma news
kapil sharma newssaam tv

मुंबई: प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माचा (Kapil Sharma) जेव्हाही उल्लेख होतो. तेव्हा तो केवळ त्याच्या कॉमेडीबद्दलच. कपिल शर्मा हा त्याच्या द कपिल शर्मा शो मध्ये कलाकारासोंबत प्रेक्षकाचं मनोरंजन करतो. मात्र अलिकडेच कपिल त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. 'ज्विगाटो' या त्याच्या चित्रपटाचे नाव आहे. आशयाचे कौतुक होत असलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. चित्रपटात कपिल शर्मा फूड डिलिव्हरी बॉयच्या भूमिकेत दिसत आहे.

kapil sharma news
Emraan Hashmi : काश्मीरमध्ये इमरान हाश्मीवर दगडफेक; आरोपीला अटक

कॉमेडीस्टार कपिल शर्मा छोट्या पडद्यानंतर आता रूपेरी पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झाला आहे. नुकताच चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून कपिलच्या व्यक्तिरेखेने लक्ष वेधून घेतलं आहे. चाहत्यांची चित्रपटाविषयीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पण कपिलचा हा चित्रपट तुम्हाला त्याच्या धमाकेदार शैलीत हसवणार नाही, तर एका अप्रतिम कथेवर आधारित आहे. चित्रपटात कपिलची एक वेगळी शैली अनुभवता येणार आहे. नेहमीच प्रेक्षकांना खळखळून सोडणारा अभिनेता वेगळ्या व्यक्तिरेखेत दिसतो आहे.

'ज्विगाटो' चे दिग्दर्शन नंदिता दास यांनी केले आहे. हा चित्रपट एका कारखान्याच्या एक्स-फ्लोर मॅनेजरबद्दल आहे. जो साथीच्या आजारात नोकरी गमावतो. यानंतर जिवनात येणारे अडथळे, कुटुंबाचं दडपण यासाठी नवीन कामाच्या संधी शोधू लागतो. परंतु नोकरी मिळत नसल्याने फूड डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो. रेटिंग आणि इंसेटिंवच्या मागे फिराव लागतं. लोकांना रात्री-अपरात्री, सकाळी-संध्याकाळी जेवण पोहोचवण्याची धडपड तसेच ते वेळेत पोहोचवण्यासाठी डिलिव्हरी बॉय त्याच्या आयुष्यात कोणत्या कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागतो हे या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. हा चित्रपट आयुष्यातील अथक पण आनंदाच्या प्रत्येक क्षणाविषयी आहे.

kapil sharma news
Boyz 3: 'बॉईज ३'ने घेतली कोटींची उड्डाणे; पहिल्या तीन दिवसांतच...

कपिल शर्माच्या ज्विगाटो या चित्रपटाची घोषणा टोरोंटो आंतरराष्ट्रीय महोत्सव २०२२ मध्ये करण्यात आली. महोत्सवात चित्रपटाला प्रंचड प्रोत्साहन मिळाले. आता हा चित्रपट बुसान फिल्म महोत्सव २०२२ मध्ये देखील दाखवला जाणार आहे. महोत्सव ५ ऑक्टोबर पासून आहे. चित्रपटातून कपिल गंभीर भूमिकेत दिसणार आहे. याआधीही कपिलने चित्रपटांमध्ये नशीब आजमावले आहे, 'किस किस को प्यार करूं' आणि 'फिरंगी' या दोन चित्रपटांमध्ये तो दिसला आहे.

Edited By- Manasvi Choudhary

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com