Friendship Day : करण जोहर आणि फराहच्या मैत्रीला २५ वर्षे पूर्ण; शेअर केला एक मजेदार व्हिडिओ

बॉलिवूडचा निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर आणि प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका फराह खानच्या मैत्रीचे किस्से बी-टाऊनमध्ये नेहमीच चर्चेचा विषय असतात.
Karan Johar And Farah Khan
Karan Johar And Farah KhanSaam Tv

Friendship Day 2022 |मुंबई : बॉलिवूडचा निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर(Karan Johar) आणि प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका फराह खानच्या(Farah Khan) मैत्रीचे किस्से बी-टाऊनमध्ये नेहमीच चर्चेचा विषय असतात. आज फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने करण आणि फराहने एक व्हिडिओ शेअर केला आहे. दोघेही एकमेकांनची मस्करी करण्यात किती पटाईत आहेत हे या व्हिडिओमध्ये दिसून येते. या व्हिडिओमध्ये करण आणि फराहने एकमेकांना टॅग केले आहे. हा व्हिडिओ खूपच मजेदार आहे. यामध्ये करण फराहच्या फॅशन सेन्सची खिल्ली उडवताना दिसत आहे. याला प्रत्युत्तर देताना फराहही त्याचा खरपूस समाचार घेताना दिसत आहे.

Karan Johar And Farah Khan
Uunchai : अमिताभ बच्चन यांच्या 'उचाई' चित्रपटाचे पहिले टीझर पोस्टर फ्रेंडशिप डेला रिलीज

फराह खान आणि करण जोहरने शनिवारी रात्री त्यांच्या इन्स्टाग्राम हॅंडलवर व्हिडिओ शेअर केला. यामध्ये करण जोहर फराह खानच्या फॅशन सेन्सची खिल्ली उडवत तिला लाल रंगाचे कपडे परिधान करण्यासाठी 'स्टॉप साइन' म्हणून चिढवतो. करण फराहच्या नेकपीसचीही खिल्ली उडवतो आणि म्हणतो की हे नेकपीस एखाद्या मॅडलसारखे दिसते

फराह खान लगेच त्याला प्रतिउत्तर देते आणि म्हणते, 'नाही, हे मॅडलतुझ्यासोबत २५ वर्षांची मैत्री टिकवली म्हणून आहे. यानंतर फराह करण जोहरच्या घातलेल्या शर्टची खिल्ली उडवत म्हणते 'अरे देवा, तुझा शर्ट. इतके चेहरे आहेत का तुझे? एक चेहरा यशस्वी लोकांसाठी आणि बाकी चेहरे जे प्रयत्न करतात त्यांच्यासाठी हो ना?'

Karan Johar And Farah Khan
Urfi Javed Hospitalised : उर्फी जावेद तापाने फणफणली; तिला नेमकं झालंय काय? आली मोठी अपडेट

करण जोहरने उत्तर दिले, 'फराह मी पक्षपाती नाही. जा, मी तुझ्याशी बोलणार नाही'. या करण आणि फराहच्या मिश्कील व्हिडीओवर चाहते मोठ्या प्रमाणात शेअर करून कमेंट करत आहेत.

'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटासाठी करण जोहर आणि फराह खान बऱ्याच काळानंतर एकत्र काम करत आहेत. त्यांनी शेवटचे 'स्टुडंट ऑफ द इयर' मध्ये एकत्र काम केले होते, ज्या चित्रपटातून आलिया भट्ट, वरुण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. फराहने या चित्रपटात कॅमिओही केला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com