
मुंबई : बॉलिवूड दिग्दर्शक, निर्माता करण जोहर(Karan Johar) सध्या त्याच्या 'कॉफी विथ करण ७' या चॅट शोमुळे चर्चेत आहे. त्याच्या शोचा पाचवा एपिसोड लवकरच येणार आहे. ज्यामध्ये अभिनेता आमिर खान(Aamir Khan) अभिनेत्री करीना कपूर खानसोबत(kareena kapoor Khan) या शोमध्ये सहभागी होणार आहे. या शोमध्ये दोघेही त्यांच्या आगामी 'लाल सिंह चड्ढा'(Laal Singh Chadha) या चित्रपटाचे प्रमोशन करणार आहेत. शोचा प्रोमो रिलीज झाला आहे. हा भाग उद्या म्हणजेच गुरुवारी प्रसारित केला जाईल. दरम्यान, शो प्रसारित होण्यापूर्वी करण जोहरने त्याच्या इन्स्टाग्राम हॅंडलवर दोन सीक्रेट नोट्स शेअर केल्या आहेत. करणच्या या नोट्स पाहिल्यानंतर त्याचे चाहते आश्चर्यचकित झाले आहेत.
करण जोहरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटच्या स्टोरीवर त्याच्या दोन्ही सीक्रेट नोट्स शेअर केल्या आहेत. जे पाहून असे दिसते की त्याने मध्यरात्री इन्स्टाग्रामवर ही पोस्ट शेअर केली आहे. त्याने आपल्या पहिल्या सीक्रेट नोटमध्ये लिहिले, 'सेंसिटिविटी इज अ टू वे ऑफ स्ट्रीट...'
त्याचबरोबर, दुसर्या एका सीक्रेट नोटमध्ये त्यांने हिंदीत लिहिले, 'प्रत्येक जखमेवर मलम लावले तर प्रेम कसे करू शकणार' करणच्या दोन्ही सीक्रेट नोट्स सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्या आहेत. त्याने अशा नोटस् का लिहिल्या हे जाणून घेण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक झाले आहेत मात्र, आतापर्यंत करणच्या या नोटस् विषयी कोणतीही विशेष माहिती समोर आलेली नाही.
'कॉफी विथ करण-७' या चॅट शो व्यतिरिक्त, करण जोहर सध्या त्याच्या आगामी 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटाच्या कामाध्ये व्यग्र आहे. या चित्रपटाद्वारे करण तब्बल १२ वर्षांनंतर पुन्हा एकदा दिग्दर्शनाच्या दुनियेत परतत आहे. या चित्रपटात आलिया भट्ट आणि रणवीर सिंग लीड रोलमध्ये आहेत. या दोघांशिवाय शबाना आझमी, धर्मेंद्र आणि जया बच्चन यांसारखे दिग्गज कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.