करण जोहरची वाढदिवसाची पार्टी ठरली कोरोना स्प्रेडर ?

करण जोहारच्या या पार्टीत सहभागी झाल्याने अनेक कलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे. करण जोहरची ही वाढदिवसाची पार्टी कोरोना स्प्रेडर ठरली आहे.
Karan Johar
Karan Johar Saam Tv

मुंबई : सिनेसृष्टीतील प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर (Karan Johar) याने नुकतीच वयाची पन्नाशी गाठली. (Karan Johar 50th birthday). त्याने मुंबईतील अंधेरी पश्चिम येथे असलेल्या यशराज फिल्म स्टुडिओमध्ये एका भव्य पार्टीचे आयोजन केले होते. ज्यामध्ये त्याने बॉलिवूडच्या सर्व प्रसिद्ध कलाकारांना आमंत्रित केले होते. सलमान खान (salman khan),शाहरुख खान (shah rukh khan)पासून सारा अली खान (sara Ali khan)आणि कटरिना कैफ (katrina kaif)पर्यंत अनेक सेलिब्रिटी या पार्टीत सहभागी झाले होते. या पार्टीमध्ये करण जोहारला भरभरुन भेट वस्तू व शुभेच्छा दिल्या गेल्या. पण मात्र करण जोहरच्या या पार्टीत सहभागी झाल्याने अनेक कलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे करण जोहरची ही वाढदिवसाची पार्टी कोरोना स्प्रेडर ठरली आहे. ( karan johar birthday party News )

हे देखील पाहा -

२५ मे च्या रात्री यशराज फिल्म स्टुडिओमध्ये सिनेतारकांचा मेळाच भरला होता. निमित्त होतं ते म्हणजे करण जोहरच्या ५० व्या वाढदिवसाची पार्टी. अनेक सेलिब्रिटी येथे पोहोचले आणि त्यांनी तेथे खूप धमाल केली, ज्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. परंतु मिळालेल्या माहितीनुसार, करण जोहरच्या या समारंभात गेलेल्या बॉलिवूड सेलिब्रिटींसह तब्बल ५० ते ५५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. मात्र काही जण भीतीने कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती देत ​​नाही आहेत. मात्र, करण जोहरच्या एका सहायकाने या वृत्तांचे खंडन केलं आहे.

करण जोहरच्या सहायकाने एका मासिकाशी संवाद साधताना संगितले की, करण जोहर सध्या 'कॉफी विथ करण'चे चित्रीकरण करत असून त्याने त्यासाठी आरटीपीसीआरची आवश्यक चाचणी देखील केली आहे. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी सेटवर सर्व निर्बंध पाळले जात आहेत. कार्यक्रमामध्ये येणाऱ्या सर्व पाहुण्यांना देखील हे निर्बंध पाळण्याची सूचना दिली आहे.

आलेले पाहुणे कोविड पॉझिटिव्ह असल्याची बातमी खोटी...

करण जोहरच्या समारंभात आलेल्या ५० ते ५५ पाहुण्यांना कोरोनाचे संक्रमण झाल्याच्या बातम्यांना करण जोहरच्या सहायकाने अफवा असल्याचे म्हटले आहे. करण जोहरचा सहाकारी म्हणाला की 'ही पार्टी सुमारे १० दिवसांपूर्वी झाली होती. त्यामुळे करण जोहरच्या पार्टीत ५० ते ५५ पाहुणे कोविड पॉझिटिव्ह असल्याचे वृत्त चुकीचे आहे'.

Karan Johar
Mumbai: सलमान खानला धमकीचं पत्रं; 'G.B. L.B.' नावाने धमकी, पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये

करण जोहरच्या सहायकाने पुढे सांगितले की, 'पार्टीत उपस्थित असलेले बहुतेक सेलिब्रिटी आणि पाहुण्यांनी नंतर त्यांच्या कामसाठी वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास देखील केला आहे. मग जेव्हा सेलिब्रिटींना कोरोना होण्याचा प्रश्न येतो, तेव्हा करण जोहरचे नाव मध्येच कसे येऊ शकते ? आम्ही तुम्हाला सांगतो की, अक्षय कुमार आणि कार्तिक आर्यन हे दोघेही कोरोना पॉझिटिव्ह आहेत आणि ते दोघेही करण जोहरच्या पार्टीत उपस्थित नव्हते'. परंतु, त्याचवेळी अक्षय कुमार आणि कार्तिक आर्यन नंतर आदित्य रॉय कपूर, शाहरुख खान आणि कटरिना कैफ देखील कोविड पॉझिटिव्ह असल्याची बातमी समोर आली होती. पण हे तिघेही कलाकार करण जोहरच्या पार्टीत हजर होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com