Alia Bhatt in Koffee with Karan: कॉफी विथ करणचा आठवा सीजन लवकरच येणार; पहिल्या भागात दिसणार आलिया-रणबीर? चर्चांना उधाण

Koffee with Karan Season 8: करण जोहरच्या शोच्या शेवटच्या भागात शाहरुख खान देखील दिसू शकतो.
Karan Johar Image
Karan Johar Image Saam Tv

Karan Johar's Koffee With Karan Season 8: करण जोहर नेहमीच चर्चेत असतो. त्याच्या प्रत्येक वक्तव्याची बातमी होते. नुकताच करण अनुष्का शर्माच्या एका जुन्या व्हिडिओमुळे चर्चेत आला होता. तसेच कविता करत कंगनाला टोला देखील लगावला होता. याशिवाय प्रियांका चोप्राच्या बाबतीत करण जोहरचेही नाव पुढे आले होते.

या सगळ्यात करण जोहर लवकरच कॉफी विथ करणच्या आठवा सीझन घेऊन येत आहे. करण जोहरचा हा शो खूप चर्चेत आहे. यावरूनही बराच वाद झाला आहे. या शोचा आठवा सीझन लवकरच सुरू होणार आहे.

Karan Johar Image
81st Master Dinanath Mangeshkar Award: ८१ व्या दिनानाथ मंगेशकर पुरस्कारांची घोषणा, या कलाकारांचा होणार गौरव

करण जोहरचा 'कॉफी विथ करण' हा शो सर्वाधिक चर्चेत असतो. चित्रपट निर्माता करण जोहरच्या आमंत्रणावरून त्याच्या प्रत्येक सीझनमध्ये, बॉलीवूडमधील टॉप अभिनेते आणि अभिनेत्री सहभागी होतात आणि त्यांच्या जीवनाशी संबंधित गोष्टी शेअर करतात. या शोमध्ये स्टार्स त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक रहस्ये उघड करताना दिसले आहेत. आता या शोच्या आठव्या सिझनचीही तयारी सुरू आहे.

करण जोहरचा हा शो जूनच्या अखेरीस सुरू होणार असल्याचा दावा मीडिया रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या शोच्या सुरुवातीच्या भागात आलिया भट आणि रणबीर कपूर येणार असल्याची चर्चा आहे. या शोमध्ये हे कपल त्यांच्या नवविवाहित आयुष्याबद्दलही बोलणार असल्याचे बोलले जात आहे.

करण जोहरच्या शोच्या शेवटच्या भागात शाहरुख खान देखील दिसू शकतो. या सीझनमध्ये करीना कपूर खान, अक्षय कुमार, वरुण धवन, सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि इतर काही बिग स्टार्सही दिसणार असल्याचे बोलले जात आहेत. रिपोर्ट्सनुसार, हा शो जूनच्या अखेरीस OTT वर स्ट्रीम होऊ शकतो.

करण जोहरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, त्याचा चित्रपट रॉकी आणि राणीची प्रेमकथाचे तो दिग्दर्शन करणार आहे. त्याचा हा चित्रपट लवकरच मोठ्या पडद्यावर येणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत रणवीर सिंग आणि आलिया भट्ट दिसणार आहेत. याशिवाय या चित्रपटात इतर सेलिब्रिटीही दिसणार आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com