'हा' चित्रपट आधी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार नाही, तर कोर्टात होणार स्क्रिनिंग

करण जोहरवर केला चित्रपटाची कथा चोरल्याचा आरोप कोर्टात यासंदर्भात सुनावणी सुरु.
'हा' चित्रपट आधी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार नाही, तर कोर्टात होणार स्क्रिनिंग
karan johars upcoming movie jug jug jiyo allegationsaam tv

मुंबई: बॉलिवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता वरुण धवन त्याच्या आगामी सिनेमा 'जुग जुग जियो' च्या प्रमोशनमध्ये सध्या व्यग्र आहे. या सिनेमामध्ये वरुण धवनसोबत अनिल कपूर, कियारा अडवाणी, नीतू सिंग आणि मनीष पॉल महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. मुंबई, पुणे, दिल्ली अशा अनेक शहरांमध्ये जाऊन 'जुग जुग जियो'(jug jug jiyo) या सिनेमाची ही टीम प्रमोशन करत आहे.नुकतीच ही टीम डान्स रिअॅलिटी शो 'डान्स दिवाने ज्युनियर्स'च्या सेटवर जाऊन आली. तिथे त्यांनी प्रमोशनसोबत या शोच्या स्पर्धकांसोबत खूप धमाल केली. 'जुग जुग जियो'या सिनेमाची टीम त्याच्या प्रमोशनमध्ये कोणतीही कसर सोडत नाही आहेत. पण अशातच प्रदर्शित होण्यापूर्वीच हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

karan johars upcoming movie jug jug jiyo allegation
'पुष्पा: द रुल' या चित्रपटाची स्टोरी झाली लीक; श्रीवल्लीचा...

या चित्रपटाचा निर्माता करण जोहर याच्यावर या चित्रपटातील गाणी चोरल्याचा आरोप आधी झाला होताच, परंतु आता या चित्रपटची संपूर्ण कथा देखील चोरल्याचा आरोप याचिकाकर्त्याने केला आहे. या प्रकरणी रांची दिवाणी न्यायालयात (Ranchi Civil Court) कॉपीराइट या कायद्यांतर्गत याचिका दाखल करण्यात आली आहे.

कोर्टात होणार पहिली स्क्रीनिंग

कोर्टाने यासंदर्भात सुनावणीमध्ये असे सांगितले की, 'या सिनेमाची पहिली स्क्रीनिंग कोर्टात करण्यात येईल. त्यासाठी कोर्टाने २१ जून ही तारीख निश्चित केली आहे. कोर्टात सुनावणीदरम्यान करण जोहरच्या वतीने ज्येष्ठ वकील चित्तरंजन सिन्हा उपस्थित होते. तर याचिकाकर्त्याच्या वतीने कुमार वैभव यांनी कोर्टात युक्तिवाद केला होता. याचिकाकर्ते विशाल सिंग यांच्या वतीने उपस्थित असलेल्या वकिलांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, 'न्यायाधीश एम.सी. झा यांच्या कोर्टासमोर या प्रकरणी सुनावणी सुरू आहे.

karan johars upcoming movie jug jug jiyo allegation
'डॉन ३' का इंतजार तो...? अमिताभ बच्चन यांच्या पोस्टची तुफान चर्चा, वाचा सविस्तर

करण जोहरवर कोणते आरोप?

याचिकाकर्त्याने करण जोहरवर अनेक आरोप केले आहेत. 'पन्नी रानी' ही कथा करण जोहरला पाठवली होती. करण जोहरने त्याची कथा वाचून ती स्क्रिप्ट परत पाठवली आणि सांगितले की ही स्क्रिप्ट आम्ही घेऊ शकत नाही. स्क्रिप्ट निवडली गेली नाही, असे याचिकाकर्त्याला वाटले. मात्र, 'जुग जुग जियो' या सिनेमाचा प्रदर्शित झालेला ट्रेलर बघितल्यानंतर ही करण जोहरने नाकारलेली स्क्रिप्ट असल्याचेही याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे.

यानंतर याचिकाकर्त्याने रांची दिवाणी कोर्टात धर्मा प्रोडक्शनच्या विरोधात कॉपीराइट कायदा १९५७ चे उल्लंघन केल्याबद्दल आणि त्यांच्या नकळत कथा चोरल्याची तक्रार दाखल केली. आता या संपूर्ण प्रकरणाबाबत २१ जून रोजी रांची कोर्टात या सिनेमाची स्क्रीनिंग होणार आहे. या सिनेमाची कथा चोरीला गेली आहे की नाही, हे या सुनावणीवेळी बघितलं जाईल.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com