Karan Mehra - Nisha Rawal: टीव्ही इंडस्ट्रीत खळबळ; करण मेहराचे निशावर गंभीर आरोप, मानलेल्या भावासोबतच...

टीव्ही इंडस्ट्रीत खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. टीव्ही अभिनेता करण मेहरा आणि त्याची पत्नी निशा रावल यांच्यात काही दिवसांपासून सर्व काही आलबेल नाही.
Karan Mehra and Nisha Rawal
Karan Mehra and Nisha RawalSaam Tv

Karan Mehra - Nisha Rawal : टीव्ही इंडस्ट्रीत खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. टीव्ही अभिनेता करण मेहरा आणि त्याची पत्नी निशा रावल यांच्यात काही दिवसांपासून सर्व काही आलबेल नाही. गेल्या वर्षी निशाने करणवर कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप केला होता. त्यानंतर या अभिनेत्याला अटक करण्यात आली होती.

Karan Mehra and Nisha Rawal
Aila Bhatt: आलिया भट्टने रणबीर कपूरबद्दल केला मोठा खुलासा, म्हणाली...

करणला अटक केल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला होता. अटकेनंतर करण मेहरा (Karan Mehra) याला जामीनही मिळाला होता. आता दोघांमध्ये त्यांचा मुलगा काविश याची कस्टडी घेण्यावरून कायदेशीर लढाई सुरू आहे. करणने या सगळ्या प्रकरणावर बराच काळ मौन साधलं होतं. त्याने अलीकडेच घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत निशावर (Nisha Rawal) अफेअरचे आरोप केले होते. करणच्या या आरोपांना निशानंही उत्तर दिलं आहे.

Karan Mehra and Nisha Rawal
प्रियांका चोप्रा आणि निक जोनसचा 'हा' लूक आला समोर; जो पाहून व्हाल थक्क!

करणने मुंबईत एक पत्रकार परिषद घेऊन निशावर अफेअर सुरू असल्याचा आरोप केला होता. निशा ही रोहित नावाच्या एका व्यक्तीसोबत त्याच्या घरात राहते. करणच्या आरोपांवर आता निशानेही प्रतिक्रिया दिली आहे.

करणने पत्रकार परिषद घेतल्यानंतर काही तासांतच त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. एका वृत्त संकेतस्थळाला दिलेल्या माहितीनुसार, मी याबाबत कोणतीही प्रतिक्रिया देऊ इच्छित नाही. त्याने पत्रकार परिषद घेतली आहे. त्याच्या प्रत्येक वक्तव्याला प्रत्युत्तर देऊ शकत नाही. मात्र, निशाने आतापर्यंत करणच्या कोणत्याही आरोपांवर अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

करणने अफेअरचे आरोप केले होते

करण मेहराने निशाचा अफेअर सुरू असल्याचा आरोप केला होता. रोहित हा तिचा मानलेला भाऊ आहे. त्याने तिचे कन्यादानही केले होते. माझ्याकडे याआधी कोणतेही पुरावे नव्हते. त्यामुळे मी याबाबत काहीही बोललो नव्हतो. आता मी कोर्टात पुरावे सादर केले आहेत. त्यानंतर मी आज यावर बोलत आहे, असेही करणने सांगितले होते.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com