करणवीर बोहरा याच्यासह तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी सोमवारी रात्री गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करत आहे.
करणवीर बोहरा याच्यासह तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल
Karanvir Bohra News, Bollywood News in MarathiSaam Tv

मुंबई - मुंबई पोलिसांनी (Police) अभिनेता करणवीर बोहरा याच्यासह तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. बोहरा याच्यावर ओशिवरा येथील विंडरमेअर येथे राहणाऱ्या व गारमेंटचा व्यवसाय करणाऱ्या ४० वर्षीय महिलेकडून १ कोटी ९९ लाख रुपये घेऊन ते पैसे परत न केल्याचा आरोप आहे. (Karanvir Bohra News)

बोहरा याची २०१९ मध्ये या महिलेसोबत मैत्री झाली होती. याच वेळी बोहराचा चित्रपट 'हमे तुमसे प्यार कितना' हा आला होता. या चित्रपटाच्या रिलिजसाठी त्याने तक्रारदार महिलेकडून ३५ लाख रुपये घेतले होते. तसेच त्यानंतर आरटीजीएसटी द्वारे १ कोटी ६६ लाख रुपये घेतल्याचा दावा महिलेने केला आहे.

हे देखील पाहा -

तसेच पैसे स्विकारताना ही रक्कम अडीच टक्के व्याजाने परत करण्याचे आमीषही बोहरा याने दिले होते. महिलेचा विश्वास बसावा यासाठी त्याने त्याच्या फ्लॅटची झेराॅक्स कागदपत्रेही तारण ठेवल्याचा आरोप तक्रारदार महिलेने केला आहे.

यातील अंदाजे १ कोटीहून अधिक रक्कम ही बोहरा याने महिलेला परत केली. मात्र उर्वरित रक्कम देत नव्हता. याबाबत त्याच्याकडे किंवा त्याचा घरतले पत्नी तजीनदर सिंधु, आई मधुलता, महेंद्र कुमार बोहरा याच्याकडे विचारणा केली असता ते उडवा उडवीची उत्तरे देत तक्रारदारास शिवीगाळ करून मारण्याची धमकी देत असल्याचा दावा तक्रारदार महिलेने केला आहे.

Karanvir Bohra News, Bollywood News in Marathi
उल्हासनगर मध्ये पोलिसानेच केली महिलेची हत्या; मृतदेह घेऊन २४ तास फिरवत होता गाडीत

या प्रकरणी पोलीस ठाण्यात महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी सोमवारी रात्री गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करत आहे. बोहरा याने हिंदी चित्रपटासह अनेक सिरियलमध्ये आघाडीच्या भूमिका केल्या आहेत. किस्मत कनेक्शन, मुंबई १२५ KM, त्याच बरोबर २००१ ची प्रसिद्ध मालिका कसोटी झिंदगी की, नागिन २, शरारत, सौभाग्यवती भवं, कबुल है यासह बोहरा याने नच बलिये सिजन ४, झलक दिखला जा सीजन ६, खतरो के खिलाडी सीजन ५ आणि बिग बाॅस सीजन १२ मध्येही सहभगी झाला होता.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com