बेबोच्या अडचणीत वाढ; बीडमध्ये तक्रार दाखल...

बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.
बेबोच्या अडचणीत वाढ; बीडमध्ये तक्रार दाखल...
बेबोच्या अडचणीत वाढ; बीडमध्ये तक्रार दाखल...Saam Tv

विनोद जिरे

बीड - बॉलिवूडची अभिनेत्री करीना कपूर Kareena Kapoor विरोधात, बीडच्या Beed शिवाजीनगर पोलीस Shivajinagar Police Station ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. करीना कपूर व सहकारी लेखीका आदिती शहा Aditi Shah यांनी प्रेग्नसी बायबल Bible नावाचे पुस्तक प्रकाशित केले आहे. त्यात बायबल हा शब्द वापरून ख्रिश्चन धर्मियांच्या भावना जाणूनबुजून दुखविल्या आहेत असा आरोप करण्यात आले आहे. असा आरोप ख्रिश्चन समाजातील अल्फा ओमेगा या संघटनेने केला आहे.

हे देखील पहा -

त्याचबरोबर याचा आम्ही जाहीर निषेध करतो, कारण ख्रिश्चन धर्मियांचा बायबल हा पवित्र ग्रंथ आहे. तरी या पुस्तकावरील बायबल हा शब्द तात्काळ हटवावा व अभिनेत्री करीना कपूर, आदिती शहा व प्रकाशकांनी तात्काळ ख्रिश्चन समाजाची माफी मागावी. अशी मागणी अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आशिष शिंदे यांनी केलेली आहे.

बेबोच्या अडचणीत वाढ; बीडमध्ये तक्रार दाखल...
नंदुरबार जिल्‍हा कोरडा अन्‌ तापी नदी वाहतेय दुथडी

दरम्यान, याविषयी शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक साईनाथ ठोंबरे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, की याविषयी गुन्हा वगैरे दाखल होणार नाही. मात्र जी तक्रार आहे ती वरिष्ठांना पाठवण्यात आली असून वरिष्ठ सांगतील त्यानुसार कारवाई होईलअशी माहिती ठोंबरे यांनी दिली आहे.

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com