
मुंबई : बॉलिवूडची बेबो म्हणजेच करीना कपूर खान(Kareena Kapoor Khan) ही बी-टाउनच्या टॉप सेलिब्रिटींपैकी एक आहे, जी तिच्या व्यावसायिक आयुष्यासोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही नेहमी चर्चेत असते. करीना नुकतीच तिच्या तिसऱ्यांदा प्रेग्नेंट असल्याच्या अफवेमुळे चर्चेत होती. ही बातमी समोर आल्यानंतर तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून ती तिसऱ्यांदा आई होणार नसल्याचे स्पष्ट केले. आता बेबोने या प्रकरणावर एका मुलाखतीत उघडपणे वक्तव्य केले आहे. ती म्हणाली की सेलेब्स आणि अभिनेत्री सामान्य लोकांसारखेच आहेत आणि त्यांना देखील सर्वसामान्यांसारखे जगण्याचा आणि स्वतःची निवड जपण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे.
एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, 'मी(Instagram) इन्स्टाग्राम अकाउंटवर खूप अॅक्टिव्ह असते. या अॅपमुळे मी फोटोंच्या माध्यमातून स्वतःला प्रेझेंट करत असते. मला माझं इन्स्टाग्राम पेज कोणत्याही फिल्टरशिवाय ठेवायला आवडते आणि त्याचा मला आनंद आहे. मला माझ्या इन्स्टाग्राम पेजच्या फोटोत माझे छोटेसे कुटुंब दिसते. मी यापेक्षा जास्त काही गोष्टी सोशल मीडियावर शेअर करू शकत नाही.
जेव्हा करीनाला विचारण्यात आले की,जेव्हा एखाद्या महिलेचे वजन वाढू लागते तेव्हा लोकांच्या मनात पहिली गोष्ट येते की ती प्रेग्नंट आहे, तुमचं यावर काय मत आहे? उत्तर देताना ती म्हणाली, मी प्रेग्नंट वाटते का तुम्हाला? यावर करीनाला तुम्ही खरच प्रेग्नंट आहात का, असे विचारले तेव्हा करीना म्हणाली, 'मी मशीन आहे का? हा निर्णय मला माझा घेऊ द्या'
करीना म्हणाली, म्हणूनच मी इन्स्टाग्राम अकाउंटवर माझ्या तिसऱ्या प्रेग्नसीबद्दल स्पष्टीकरण दिले होते. 'मित्रांनो, तुम्हा सर्वांप्रमाणेच आम्हीही माणसे आहोत. आजच्या काळात, मी अशी एक अभिनेत्री आहे, जी खरंतर सर्वात प्रामाणिक राहिली आहे. मी गरोदर असताना सर्वात कठीण टप्प्यात म्हणजे आठव्या-नवव्या महिन्यांत काम करत होते. मी अशी आहे जी काहीही लपवत नाही. प्रत्येकाला आपापल्या पद्धतीने आयुष्य जगण्याचा अधिकार असतो तसा मलाही आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.