करीना कपूरच्या दुसऱ्या मुलाचे फोटो पाहिले का ?

मानव मंगलानी यांनी हा फोटो आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.
करीना कपूरच्या दुसऱ्या मुलाचे फोटो पाहिले का  ?
करीना कपूरच्या दुसऱ्या मुलाचे फोटो पाहिले का ? saam tv

नवी दिल्ली : बॉलीवूड अभिनेत्री करिना कपूर खानने (Kareena Kapoor Khan) आपल्या दुसऱ्या मुलाला जन्म देऊन तब्बल चार महिने झाले आहेत. या चार महिन्यांनंतर करिना आणि तिच्या दुसऱ्या मुलाचा म्हणजेच जेह'चा (JehAliKhan) फोटो सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे. यात करिना आपल्या बाळाच्या कपाळावर चुंबन घेताना दिसत आहे. मानव मंगलानी यांनी हा फोटो आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. (Have you seen photos of Kareena Kapoor's second child?)

मानव मंगलानी यांनी या फोटोला, क्यूट लिटल जेह त्याची आई करिना कपूरसोबत, अशी कॅप्शन दिली आहे. करीना कपूर आणि सैफअली खान यांना दुसरे अपत्य झाल्यानंतर त्यांनी तब्बल चार महिने आपल्या मुलाचे फोटो कोणत्याही सोशल मिडीयावर शेअर केले नव्हते. आता पहिल्यांदाच करीनाचा दुसरा मुलगा 'जेह' चे फोटो समोर आले आहे. सोशल मीडियावरील चाहते करीनाच्या दुसर्‍या मुलाचेही प्रचंड कौतुक होताना दिसत आहे. मात्र काहींनी या फोटोवर शंकाही उपस्थित केल्या आहेत.

करिनाच्या एका चाहत्याने लिहीले आहे की, हा फोटो स्पष्ट दिसत नाही. तर दुसऱ्या चाहत्याने म्हटले आहे की, तैमुरचा पहिला फोटो खुपच स्पष्ट होता. तर तिसऱ्या चाहत्याचे म्हणणे आहे की, जेह आणि तैमुर दोघांमध्ये खुप साम्य आहे. तथापि, जेहचा फोटो पाहुन अशी प्रतिक्रीया त्यांच्या अनेक चाहत्यांनी दिली आहे. दरम्यान, करिना कपूरचे आपल्या दोन्ही मुलांसोबत व्हायरल झालेले फोटो तिच्या आगामी पुस्तकात दाखवले जाणार असल्याचा दावा सोशल मिडीयावर व्हायरल झालेल्या काही पोस्टमध्ये करण्यात आला आहे. असे पोस्ट पाहून लोक तिच्या पुस्तकाचे प्रिबुकींग करण्याबाबत बोलत आहेत. तथापि, करिनाचे एक पुस्तक लवकरच बाजाराच उपलब्ध होणार आहे.

- जेह नावाचा अर्थ काय?

ज्योतिषशास्त्राचे ज्ञान असणारे लोकांच्या म्हणण्यानुसार 'जेह' या शब्दाचा अर्थ 'येणे' असा आहे. या नावाचा अर्थ खूप सकारात्मक आहे आणि हा एक पारशी शब्द आहे. जो सैफ आणि करीना (KareenaKapoorKhan) यांनी आपल्या मुलाच्या नावासाठी निवडला आहे. करीना कपूर खान आणि सैफच्या पहिल्या मुलाच्या नावामुळे बराच वाद झालेला पाहायला मिळाला. त्यानंतर आपल्या दुसऱ्या बाळाचे नाव आपल्या चाहत्यांना सांगण्यासाठी करिना कपून आणि सैफ अली खान यांनी बराच वेळ घेतला.

Edited By- Anuradha Dhawade

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com