Kareena Kapoor : करीना कपूरने केला मोठा खुलासा, सैफ अली खान कसा सांभाळतो त्याच्या चारही मुलांना?

बॉलिवूडची बेबो म्हणजेच करीना कपूर खान सध्या तिच्या आगामी चित्रपट 'लाल सिंह चड्ढा'च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे.
Kareena Kapoor And Family
Kareena Kapoor And FamilySaam Tv

मुंबई : बॉलिवूडची बेबो म्हणजेच करीना कपूर खान(Kareena kapoor Khan) सध्या तिच्या आगामी चित्रपट 'लाल सिंह चड्ढा'(Laal Singh Chadha)च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी करीना कपूर खान अभिनेता आमिर खानसोबत करण जोहरच्या प्रसिद्ध चॅट शो 'कॉफी विथ करण सीझन ७'च्या पाचव्या भागात सहभागी झाली होती. या शोमध्ये करीनाने तिच्या 'पर्सनल टू प्रोफेशनल' आयुष्याविषयी मोकळेपणाने सांगितले. त्याचबरोबर तिने अनेक मनोरंजक खुलासेही केले. याशिवाय ती तिच्या 'मॉडर्न फॅमिली'मधील प्रत्येक नाते कसे सांभाळते याबद्दलही तिने सांगितले.

Kareena Kapoor And Family
विराटची नवी इनिंग सुरू लवकरच; सोशल मीडियावरील 'त्या' फोटोने चर्चेला उधाण

'कॉफी विथ करण सीझन ७' च्या नुकत्याच प्रसारित झालेल्या एपिसोडमध्ये करण जोहरने करीना कपूरला सैफ अली खान आणि अमृता सिंगची मुलं सारा अली खान आणि इब्राहिम अली खानसोबत सैफ अली खान आणि तिच्या नात्याला कसे संभाळते या विषयी विचारले, ज्यावर करीनाने उत्तर दिले की 'हे इतके अवघड नाही जेवढे लोकांच्या मनात आहे'.

Kareena Kapoor And Family
Sonam Kapoor : कुणीतरी येणार येणार... याच महिन्यात सोनम कपूरच्या घरी येणार चिमुकला पाहुणा

करीना पुढे म्हणाली, 'हे एवढं अवघड नाही. प्रत्येकाचा वेळ असतो. सैफला त्याच्या प्रत्येक मुलासोबत वेळ घालवायला आवडतो. तो त्याच्या मुलांमध्ये खूप छान समतोल ठेवतो. आम्ही सगळे एकत्र असतो तेव्हा मला खूप छान वाटते. याशिवाय सैफला कधीकधी एकांतात वेळ घालवायचा असतो. किंवा कधीकधी कॉफी आणि सारासोबत किंवा फक्त एकटे एक-दोन तास घालवायचे असतात. तो नेहमी माझ्याशी याबद्दल बोलतो'.

'सैफ पुढे काय करणार आहे याबद्दल नेहमी तो त्याचे प्लॅन माझ्यासोबत शेअर करतो. जेव्हा-जेव्हा सैफला वाटते तेव्हा तो मला सांगतो की मी आज सारासोबत वेळ घालवणार आहे किंवा मी एकटा राहणार आहे. मी फिरायला जाणार आहे. मला वाटतं की सारा आणि सैफमध्ये खास बॉण्ड आहे. सैफसाठी त्याने आपल्या प्रत्येक मुलाला वेळ देणे खूप महत्वाचे आहे. मला माहीत नाही लोक असा विचार का करतात. पण सैफ त्याच्या प्रत्येक मुलाला वेळ देतो आणि त्यांच्यासोबत खूप छान असतो आणि हे तितके अवघड नाही', असे करीना करण जोहरला सैफ अली खानबद्दल सांगताना म्हणाली.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com