Kareena Kapoor: बॉलिवूड बॉयकॉट ट्रेंडवर करीनानेही केली नाराजी व्यक्त, म्हणते 'चित्रपट नसतील तर...'

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खाननेही एका कार्यक्रमात बॉलिवूडला करण्यात आलेल्या बॉयकॉट ट्रेंडबद्दल भाष्य केले आहे.
Kareena Kapoor Khan
Kareena Kapoor Khan Saam Tv

Kareena Kapoor: २०२२ हे वर्ष बॉलिवूडसाठी खूपच वाईट गेले. बॉयकॉट ट्रेंडमुळे अनेक चित्रपट फ्लॉप ठरले. त्याचबरोबर आता शाहरुख खानच्या 'पठान'लाही बॉयकॉट करण्याची मागणी केली जात आहे. अलिकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही नेत्यांना चित्रपटांवर भाष्य करायचे नाही, असे सांगितले. त्याच पार्श्वभुमीवर, आता बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खाननेही कोलकाता येथील एका कार्यक्रमात बॉलिवूडला करण्यात आलेल्या बॉयकॉट ट्रेंडबद्दल भाष्य केले आहे.

Kareena Kapoor Khan
KL Rahul Athiya Shetty Wedding: शुभमंगल सावधान! अखेर आथियाने घेतली KL राहुलची विकेट; विवाहसोहळा संपन्न

करीना कपूरने रविवारी कोलकाता येथे एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यादरम्यान करीना कपूरने बॉलिवूडमधील बॉयकॉट ट्रेंडवर प्रतिक्रिया दिली. त्यावेळी ती म्हणाली, 'मी याच्याशी अजिबात सहमत नाही. असे झाले तर आम्ही तुमचे मनोरंजन कसे करणार, तुमच्या जीवनात आनंद आणि मजा कशी येईल. तसेच चित्रपटच नसतील तर मनोरंजन कसे होणार.'

Kareena Kapoor Khan
This Week Movie Releases: जानेवारीच्या अंतिम आठवड्यात सिनेरसिकांसाठी खास भेट, एक दोन नाही तर सतरा चित्रपट होणार प्रदर्शित

करीना कपूर आणि आमिर खानचा गेल्या वर्षी 'लाल सिंह चढ्ढा' हा चित्रपट ही बॉयकॉट ट्रेंडचा बळी ठरला होता. या चित्रपटाबद्दल करीना म्हणाली, 'हा एक सुंदर चित्रपट आहे आणि मला आणि आमिरला प्रेक्षकांनी एकत्र पाहावे अशी माझी इच्छा होती. अशा परिस्थितीत चित्रपटावर बहिष्कार घालू नका.'

Kareena Kapoor Khan
Nawazuddin Siddiqui: नवाजुद्दीनच्या घरातला वाद पोहोचला पोलीस ठाण्यात; सासूने सुनेविरोधात पोलिसात दाखल केली एफआयआर

तर आता शाहरुख खानच्या 'पठान' चित्रपटावरही बहिष्कार टाकण्याची मागणी केली जात आहे. या चित्रपटातील 'बेशरम रंग' हे गाणे प्रदर्शित झाल्यापासून दीपिकाच्या भगव्या बिकिनीलाही प्रचंड विरोध करण्यात आला होता. त्याच पार्श्वभूमीवर आता चित्रपटात बदल करण्याची मागणी केली जात आहे. त्याचबरोबर अनेक ठिकाणी चित्रपटाचे पोस्टर जाळून निषेध करण्यात आला होता. हा चित्रपट २५ जानेवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com